ज्योतिर्लिंग विद्या मंदिर वडणगे-निगवे येथे सावित्रीच्या लेकींचा सन्मान सोहळा संपन्न.

कोल्हापूर :
3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा जन्मदिन, हा दिवस देशभरात बालिका दिन व महिला शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो ,याचे औचित्य साधून श्री ज्योतिर्लिंग विद्या मंदिर वडणगे -निगवे येथे हा दिन विविध उपक्रम राबवून संपन्न करण्यात आला.
विद्यालयातील इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींनी सावित्रीमाईंच्या विचार व कार्य आपल्या भाषणातून व्यक्त केले त्या वेळी सावित्रीमाई व ज्योतिराव फुले यांच्या संघर्षमय जीवनावरील छोटीशी नाटिका सादर करण्यात आली, तसेच पोवाडा ,ओव्या ,लाठी-काठी असे पारंपारिक कार्यक्रम देखील घेण्यात आले, सावित्रीमाईच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थिनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा संदेश दिला व महत्त्व सांगितले.
विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री मदन पाटील सर यांच्या प्रेरणेतून व उपमुख्याध्यापिका सौ सुलभा बनें मॅडम यांच्या मार्गदर्शनातून सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती उज्वला बांदेकर मॅडम यांनी हे कार्यक्रम नियोजनबद्धरीत्या पार पाडले.
श्री. चव्हाण पी. एस. सरांनी सु-मधुर संगीतातून विद्यालयाच्या वतीने सावित्रीमाईनां यांना आदरांजली वाहिली,
कलाशिक्षक विश्वास कांबळे सरांनी रेखाटलेली सावित्रीमाईंचे चित्र खास आकर्षक होते. श्रीमती अश्विनी कांबळे मॅडम व सौ पूजा चौगले मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले, त्या वेळी शिक्षक शिक्षिका ,विद्यार्थी, पालक उपस्थित होते ,कुमारी ऐश्वर्या चौगुले हिने सूत्रसंचालन केले व कुमारी क्षितिजा प्रवीण पाटील येणे ओघवत्या बोलीत सर्वांचे आभार मानले.
03 जानेवारी ते 12 जानेवारी पर्यंत हा सप्ताह विविध उपक्रमांनी संपन्न होणार आहे,,श्री संयम हुक्किरे सरांनी आपल्या हृदय स्पर्शी शब्दरचनांनी लकार्यक्रमाला शोभा वाढवली,