भुदरगड सह सेवा संस्था गटातून के.डी.सी.सी. बँक निवडणूकीत कोण मारणार बाजी ?

भुदरगड प्रतिनिधी : प्रकाश पाटील
जिल्हयाची अर्थवाहीनी म्हणून संबोधित असलेली जिल्हा मध्य.सह बँक तथा के.डी.सी सी. बँक शिखर संस्थेचा निवडणूक रणसंग्राम सुरु आहे. भुदरगड मधून सेवा संस्था गटातून गोकूळचे संचालक बॅकेचे विद्यमान संचालक रणजितसिंह पाटील सतारूढ आघाडीतून निवडणूक लढवत आहे तर विरोधात यशवंत नांदेकर उभे ठाकले आहेत .
भुदरगड मध्ये सह.सेवा संस्था गटात एकूण २०५ इतकी मते आहेत. या सहकारी संस्था गटात मा.आमदार के.पी.पाटील यांचे काम मोठे आहे. तर अलिकडच्या काळात संचालक म्हणून रणजितसिंह पाटील यांनी सेवा संस्था गटावर आपलं प्रबळ काम अधोरेखित केले आहे. त्यांची या गटावर पकड घट्ट असल्याची चर्चा तालूक्यात होताना दिसते.
या रणसंग्रामात संचालक पाटील यांच्या विरोधात यशवंत नांदेकर उभे ठाकले आहेत. मतांच्या आकडेवारीत निर्यायक बहूतांशी ठराव रणजितसिह पाटील यांच्या ताफ्यात असलेने हा विजय एकतर्फी असल्याची चर्चा जोर धरुन आहे. हा गट बिनविरोध करायचा नाही. म्हणून आघाडीशी फारकत घेतलेल्या सेना मंडळीनी नांदेकर यांच्या खांद्यावर ही उमेदवारी दिली आहे. एकूणच सेवा संस्था गटाचे जाळे त्यावर असणारी पकड व गेल्या चाळीस वर्षाहून आधिक काळ जिल्हा बॅकेवर असणारे नेतृत्व,व सक्षम कारभार या जोरावर या गटातील ही निवडणूक एकतर्फी असल्यांचे स्पष्ट बोलले जात असून मतांची बेरीज मताधिक्य याबाबत चर्चा होताना दिसते.
एकूणच जिल्हा बँक निवडणूकीत भुदरगड तालूक्यात या विजयाने उद्याच्या काळात होवू घातलेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी मित्र पक्षात नवं चैतन्य व नवी पकड दिसेल एवढं मात्र खरं.