ताज्या बातम्या

शाहू साखर कारखान्यात कर्मचाऱ्यांना पेन्शन मंजुरी प्रमाणपत्र वाटप

कागल प्रतिनिधी :

येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यात ५८ वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मंजुरी प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम झाला.सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी सदस्य गोविंद लेले, प्रादेशिक पीएफ आयुक्त बीरेंद्र कुमार यांनी रघुनाथ बेडगे, शिवानंद माळी, राजेंद्र पाटील, दिलीप पाटील, संजय सुर्वे या कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र वाटप केले.

यावेळी श्री.विरेन्द्र कुमार म्हणाले, ५८ वर्षे पुर्ण झाल्यानंतर पेन्शन मिळविण्यासाठी अपु-या कागदपत्रांमुळे कर्मचाऱ्यांना धावपळ करावी लागते.हे टाळण्यासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे कर्मचाऱ्यांनी वेळेत कागदपत्रे जमा करून अपडेट केल्यास पेन्शन वेळेत मिळते. त्यासाठी कारखान्यांनीही प्रयत्न करावेत.

श्री. गोविंद लेले म्हणाले, कर्मचारी भविष्य निधी संघटना कर्मचाऱ्यांसाठी काम करीत आहे .बदलत्या तंत्रज्ञानाचा कामकाजात समावेश केला असून ५८ वर्ष पुर्ण होण्याच्या दिवसापासून कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यासाठी प्रयत्नशिल आहे.यामध्ये कोल्हापूर विभाग चांगल्या पद्धतीने काम करीत आहे.

कर्मचार्‍यांनी भविष्य निर्वाह निधी विषयी विचारलेल्या विविध प्रश्नांना अधिकार्‍यांनी समर्पक उत्तरे दिली.

यावेळी शाहू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण,असिस्टंट प्रॉव्हिडंट फंड कमिशनर वैभव डोंगलीकर, असिस्टंट प्रॉव्हिडंट फंड कमिशनर अमित चौगुले,लेखा व अंमलबजावणी अधिकारी श्रीकांत बरगे , इनफोर्समेंट ऑफिसर बी पी नाईक,सचिन सावखंडे,गौस आत्तार आदी उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक शाहू साखर कारखान्याचे एच.आर. मॅनेजर बाजीराव पाटील यांनी केले.शाहू साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष के.आर.चव्हाण यांनी आभार मानले

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks