ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मांजराची नक्कल करणारे आता मांजरासारखे लपून बसलेत : आमदार दीपकभाई केसरकरांचे टीकास्त्र

NIKAL WEB TEAM :

भाजप आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील जीवघेणा हल्ला नितेश राणे यांना भोवणार असल्याचे म्हटले जात आहे. यातच सिंधुदुर्गातील शिवसेना नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते मांजराची नक्कल करत होते आणि आता तेच मांजरासारखे लपून बसले आहेत, असा टोला केसरकर यांनी लगावला आहे.

जे गुन्हेगार असतात ते सर्वांत जास्त पोलिसांना घाबरतात. प्रत्येक गुन्हेगार कायदा आणि पोलिसांना घाबरत असतो. कोणी गुन्हा केला हे मला माहिती नाही. पण शेवटी दुसऱ्याला चिडवायला जातो आणि म्याव म्याव करत असतो तेव्हा तेच करण्याची परिस्थती दैव आपल्यावर आणते हीदेखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपले वागणे चांगले ठेवले पाहिजे, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला. ते सिंधुदुर्गात पत्रकारांशी बोलत होते.

जे दुसऱ्यांना चिडवत असतात, त्यांच्यावर अशी वेळ ईश्वर कधी ना कधी आणत असतो. ते मांजराची नक्कल करत होते आणि आता तेच मांजरासारखे लपून बसले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. ते वाघाला घाबरतात की, न्यायालयाला हे माहिती नाही, पण घाबरत आहेत, हीदेखील वस्तुस्थिती आहे, अशी टीका दीपक केसरकर यांनी केली.

नारायण राणे आपण केंद्रात मंत्री आहोत, म्हणून आपल्या मुलाला वाचवणार अशी भूमिका घेणार असतील तर उत्तर पदेशात काय झाले हे आपण पाहिले आहे. मंत्र्याच्या मुलाला वाचवताना काय उद्रेक होतो हेदेखील लोकांनी पाहिले आहे. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात आणि शांतताप्रिय सिंधुदुर्गात होऊ नये इतकीच आशा आहे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks