“शाहू” ची निवडणूक बिनविरोधच्या पार्श्वभूमीवर समरजितसिंह घाटगे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

कागल प्रतिनिधी :
येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. या पार्श्वभूमीवर चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांच्यावर सभासद, शेतकऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव झाला. त्यांनी ग्रामदैवत गैबी, श्रीराम मंदिरसह कागलमधील विविध दैवतांचे दर्शन घेतले.छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्यासह राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले.
श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आज प्रथमच राजे समरजितसिंह घाटगे कागलमध्ये आले होते. ग्रामदैवत गैबी दर्शनानंतर कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे त्यांना खांद्यावर उचलून घेऊन जल्लोषी मिरवणूकीने श्रीराम मंदिर पर्यंत आणले.
कारखाना कार्यस्थळावर सभासद, शेतकरी, कर्मचारी हितचिंतक व जिल्ह्यातील जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी रीघ लावली होती .
एस टी स्टँड परिसरातील श्री.गणेश,श्री.साई, व श्री. लक्ष्मी मंदिरमध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतले.
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षि छत्रपती शाहू महाराज,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कागलाधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे, यांच्यासह शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष व्यक्त केला.
ग्रामदैवत गैबी दर्शनानंतर समरजितसिंह घाटगे बाहेर येताच लिंगनुर दु !! येथील सरसाबाई कांबळे यांनी राजे, गैबीराजाच्या आशीर्वादाबरोबरच सभासद,शेतकरी गोर-गरीब जनतेचासुद्धा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे.म्हणूनच ही निवडणूक बिनविरोध झाली.असे म्हणत त्यांना कडकडून मिठी मारून अभिनंदन केले.या आपलेपणाच्या अभिनंदनाने समरजितसिंह घाटगे यांच्यासह उपस्थितही भारावून गेले.