टाकवडे ग्रामपंचायत कार्यालयास कुलुप; अतिक्रमण न हटवल्यामुळे युवक आक्रमक.

शिरोळ प्रतिनिधी :
टाकवडे ता . शिरोळ येथील सि.स.नं. ३५ व १ ९ ६ चे पश्चिमेस व सि.स.नं. ३५ , ३६ , ३८ , ३ ९ व सि.स.नं. १ ९ ५ चे पूर्वेस असणारा उत्तर दक्षिण चालींचा सुमारे ८ फुट रुंदीचा रस्ता हा तसाच दक्षिणेकडील सि.स.नं .१ ९ ५ च्या दक्षिणेपासून व सि.स.नं. १ ९९ व २०० च्या पश्चिमेकडे उत्तर दक्षिण चालीचा रस्ता आहे . वर नमुद रस्त्यावर अतिक्रमण झालेने हे अतिक्रमण काढावे म्हणून मी वारंवार ग्रामपंचायतीकडे तोंडी व लेखी अर्ज देवून प्रत्येक वेळी तक्रार घेतलेली होती व आहे .
त्या अनुशंघाने मी दि . ३१/१२/२०२० रोजी आत्मदहनाचा इशारा लेखी पद्धतीने दिला होता . ३ ) त्यास अनुसरुन अर्जदार तर्फे श्री . विनायक कदम यांनी तालुका निरीक्षक भुमी अभिलेख , शिरोळ यांच्याकडे रितसर मोजणीचा अर्ज करून आपल्या क्षेत्राची मोजणी करुन घेतली . त्याचवेळी ग्रामपंचायत टाकवडे यांनी वर नमुद रस्त्याची मोजणी तालुका निरीक्षक भुमी अभिलेख शिरोळ यांचेकडून करून घेतली . त्यानुसार ग्रामपंचायत टाकवडे यांनी येथील सिटी सर्वे नं . ३५ व ३६ मधून सर्वजनिक बोळरस्ता ते सिटी सर्वे नं . २०१ पर्यंत जाणारा रस्ता व त्यावरील अतिक्रमण काढणेसाठी रस्ता मोजून मिळणेबाबत भुमी अभिलेख शिरोळ यांचेकडे अर्ज केला . त्या अर्जास अनुसरुन मो.र.नं. ७७१ ने दि . १६/१२/२०११ रोजी तालुका निरीक्षक भुमी अभिलेख शिरोळ यांनी सदरप्रमाणे मोजणी केली व दि . २०/१०/२०२० रोजी हद्दीच्या खुणा ही दाखवल्या व तसा नकाशा व अहवाल ग्रामपंचायत टाकवडे यांच्याकडे दाखल केला . तथापि श्री . आयुब हुसेन शेख रा . टाकवडे यांनी ग्रामपंचायतीकड़े आपल्या क्षेत्राची मोजणी करुन घेण्याची हमी पाळली नाही व आपल्या क्षेत्राची मोजणी जाणीवपूर्वक करुन घेतली नाही . याचे कारण म्हणजे आपण केलेले नमुद अतिक्रमण उघडकीस येवू नये तसेच अतिक्रमण काढणेस विलंब व्हावा या उद्देशाने मोजणी करुन घेतली नाही . वास्तविक सदर आयुब शेख यांनी मोजणी केली अथवा नाही केली हा त्यांचा स्वतःचा प्रश्न आहे . त्यामुळे वर नमुद रस्त्याची मोजणी होणे हेच गरजेचे होते आणि ती मोजणी झालेली आहे . त्यामुळे अन्य कोणत्याही मोजणीची आवश्यक्ता नाही .वास्तविक मो.र.नं. ७७१ च्या मोजणीच्या नकाशानुसार वर नमुद रस्त्यावर श्री आयु हुसेन शेख यांचा सिटी सर्वे नं . ३९ व चे धारक यांनी वर रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झालेले आहे . असे असतानाही ग्रामपंचायत टाकवडे आपल्या कर्तव्यात कसुर करुन रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचा विलेज पंचायत अॅक्टनुसार आपल्याला अधिकार असतानाही अतिक्रमण आपल्या निदर्शनास येवूनही व त्याचा लेखी पुरावा मिळूनही सदर लोकांना मदत करण्याच्या दृष्ट हेतूने आपण अतिक्रमण काढणे टाळत आहात . आपले हे कृत्य बेजबाबदारपणाचे व बेकायदेशीर आहे . वास्तविक रस्त्यावर अतिक्रमण होवू न देणे किंवा अतिक्रमण झाले असल्यास तात्काळ दुर करणे व रस्ता खुला करणे याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आपलीच आहे . तथापि आपण आपली जबाबदारी पार पाडत नाही असे दिसून येते .. सदरचा रस्ता बंद झालेने आमचे प्रचंड नुकसान होत असून आम्हाला घरातच कोंडल्यासारखे होत आहे . इतकेच नव्हे तर कोरानाच्या काळात व महामारीत आजारी पडल्यास दवाखान्यात जाणे येणे हे कठीण होत आहे . त्यामुळे आमचे जिवन व अस्तित्व धोक्यात आलेले आहे . रस्ता नसल्याने औषधोपचार अभावी आमचे जीवन धोक्यात येत असून मरण सोपे झाले आहे . यास सर्वस्वी ग्रामपंचायत जबाबदार रहाल . याबाबत मी गट विकास अधिकारी , शिरोळ यांच्याकडे दि . २२/११/२० / २०२१ पाठवून त्वरीत अतिक्रमण काढणेबाबत तक्रार दाखल केली होती . त्यास अनुसरुन गटविकास अधिकारी शिरोळ यांनी दि .०३ / १२ / २०२१ रोजी अतिक्रमण असल्यास तात्काळ कारवाई करण्यात यावी व या कामी विलंब केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावरच राहील अशा आशयाचे खरमरीक पत्र आपणास पाठविले होते .
तथापि आज तागायत आपण अतिक्रमण काढणेबाबत काहीही कारवाई केलेली नाही . आपण अतिक्रमण धारकांना मदत करण्याच्या हेतुने रस्त्यावरून जाण्या – येण्याच्या आमच्या नैसर्गिक अधिकारावर गदा येत असून आमच्या जाण्या – येण्याच्या मुलभूत अधिकाराचे हनन होत आहे . घरातच कोंडले जाऊन औषधोपचारा अभावी आमच्या प्रकृतीला धोका निर्माण झालेला आहे . वरीष्ठ अधिकारी या नात्याने गटविकास अधिकारी आम्हास व आमच्या कुटुंबास इच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी.असे निवेदन दिले होते. या अतिक्रमणाकामी ८ दिवसामध्ये जर कारवाई नाही झाली तर तुम्ही आम्हास इच्छा मरणाची परवानगी दिली आहे असे समजून आम्ही सर्वजन इच्छा मरण करत आहोत . याची पूर्ण जबाबदारी आपण अतिक्रमणधारक ग्रामपंचायत टाकवडे , ग्रामसेवक व सरपंच राहातील अशा आशयाचे निवेदन विनायक कदम यांनी वरीष्ठ ग्रामपंचायत व वरीष्ठ कार्यालयास दिला आहे.