हनुमान विकास सेवा संस्था नंदयाळ पंचवार्षिक निवडणूक : स्व. राजे विक्रमसिंह घाटगे शेतकरी पॅनेलचा प्रचार शुभारंभ

कागल :
हनुमान विकास सेवा संस्था नंदयाळ पंचवार्षिक निवडणूक चे 26 डिसेंबर 2021 रोजी मतदान होत असून त्यानिमित्त स्व. राजे विक्रमसिंह घाटगे शेतकरी पॅनेलचा प्रचार संमारभ थाटामाटात चालू झाला. यावेळी सर्व मतदारांनी एकमुखी पॅनेलला निवडून देण्याचा निर्धार करण्यात आला यावेळी उपस्थित मा उपसरपंच बाळकृष्ण कुणकेकर, दूध संस्थेचे चअरमन गोपाळ फगरे,मा उपसरपंच पांडुरंग कांबळे, रत्नाकर हजारे,बाळू जाधव, बी. एम. येजरे, बाबुराव कुणकेकर त्याचबरोबर सर्व उमेदवार मतदार होते. यावेळी दत्तात्रय कोराणे, बाळकृष्ण आंबिलढोके , बाळासो करडे, विनायक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक प्रदिप करडे यांनी केले आभार राजू आंबिलढोके यांनी मानले.
सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांची पिककर्ज फिरवा फिरवी आम्ही स्वतः कायमस्वरूपी मोफत करून देऊ जेणेकरून संस्थेत बसून फिरवा फिरव करतो म्हणून टक्केवारी रूपे शेतकऱ्याचे रक्त पिणाऱ्या चोराचे दुकान बंद होईल असे पॅनेलच्या वतीने घोषित करण्यात आले.