कोल्हापूर : भुयेवाडीत तीन जणांना जखमी करून गायब झालेला गवा दिसला पेठ वडगाव परिसरात

कोल्हापूर प्रतिनिधी :
गेल्या चार दिवसापासून कोल्हापूर शहरात असलेल्या गवा भुयेवाडीत तिघे जणांना जखमी करून गायब झाला होता. हाच गवा आज पेठ वडगाव परिसरातील एका शेतात आल्याचे वनविभागाच्या पथकाला समजले आहे. आज सकाळपासून वनविभागाचे पथक या गव्याच्या मार्गावर आहे. या गव्याला सुरक्षितरित्या जंगल आधिवासाकडे पाठवण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. अशी माहिती करवीर वनविभागाच्या वतीने देण्यात आली. भुयेवाडी मार्गे हा गवा काल रात्रीच पुढे आला महामार्ग ओलांडून त्याने पेठ वडगाव हद्दीमध्ये प्रवेश केला आहे. सध्या तो एका ऊस शेतीमध्ये लपलेला असून सहजपणे तो दृष्टीक्षेपात येत नाही. अशी माहितीही वनविभागाकडून देण्यात आली. दरम्यान वन्यजीव संक्रमण व उपचार विभागाचे पथक या गव्याला टेंक्वलाईझ वश कंसात बेशुद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
त्यासाठी कराड वरून व वैद्यकीय ट्रंकलाईझ गण साधनसामुग्री काल रविवारी गिरोली घाटात पोच झाली होती. त्यानुसार पशु वैद्यकीय पथक या गव्याला वेळीच ट्रंकलाईझ करणार आहेत. त्यानंतर त्याला जंगल आधिवासी सोडण्यात येईल मात्र या क्षणी हा गवा शेतीत विसावला असल्याने ट्रेक्वलाईझ करणे तूर्त अशक्य झाले आहे. काही वेळानंतर या गव्याला सादळे मादळे जंगल हद्दीकडे पोचवण्यासाठी वन विभाग प्रयत्न करत आहे गेली 48 तासात गव्याने भुयेवाडी, शिंये या भागातच असलेल्या ऊस शेती मध्ये वास्तव्य केले आहे.
हा गवा मध्यरात्रीच्या सुमारास पेठवडगाव हद्दीकडे गेला. आज सकाळपासून वनविभागाचे मुख्य पथक तसेच वन्यजीव संक्रमण अधिकारी व भरारी पथकाचे कर्मचारी या गव्यावर हालचालींवर लक्ष ठेवून आहे. हा गवा मानवी वस्तीकडे येत असल्याचे दिसताच त्याला ट्रंक्वलाईझ करण्यात येईल. मात्र हा गवा ऊसशेती मधूनच जंगल हद्दी कडे निघून गेल्यास. त्याला ट्रेन कॉलाईज केले जाणार नाही. केवळ नागरी वस्तीत हा गवा घुसल्यास, पुढे गंभीर दुर्घटना घडू शकते, असा धोका टाळण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील आहे. गवा सध्या एका ऊस शेतीमध्ये लपला असून तो आज दिवसभरात तो गवा तिथून बाहेर पडणे मुश्कील असल्याचा अंदाजही वनविभागाचा आहे.
वनविभागाची एकूण तीन पथके या गव्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. हा गवा नागरी वस्तीकडे जाणार नाही यासाठी वनविभागाच्या पथकांचा आटोकाट प्रयत्न आहे.
गेली चार दिवस शहरा नजिकच भटकणाऱ्या या गव्याला गर्दी, गोंगाटामुळे जंगल हद्दीकडे जाण्याचा मार्ग मिळाला नाही यातूनच तो अधिक आक्रमक बनला आहे. भुयेवाडी येथे गर्दी वर त्याने चाल केली यात एक तरुण ठार झाला तर दोन जखमी झाले. या घटनेमुळे वनविभाग ही अक्षरशः हतबल झाला असून ज्या भागात गवा आहे. त्या भागातील गावकरी वर्गाने सावधगिरी बाळगावी गर्दी, गोंगाट करणे किंवा गव्याला हुसकावण्याचा प्रयत्न करु नये असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.