महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवींना फासले काळे, बेळगाव बंदची हाक

बेळगांव प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
महामेळाव्याच्या ठिकाणी घुसून कर्नाटक रक्षण वेदिकेच्या मूठभर गुंडांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना काळे फासले. यामुळे सीमाभागातील मराठी जनतेतून संतापाची लाट उसळली आहे याचा निषेध म्हणून मंगळवारी बेळगाव बंदचा निर्णय मए समितीने जाहीर केला आहे.
विधीमंडळ अधिवेशनाला विरोध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समिती प्रत्येक वेळी महामेळावा भरवते. वॅक्सिन डेपो मैदानावर महा मेळाव्यासाठी विरोध केल्यानंतर येथील रस्त्यावरच समितीने महामेळावा घेण्याचे नियोजन केले होते. यावेळी करवेचे काही गुंड येथे आले व त्यांनी दीपक दळवी यांना काळे फासले. मराठी जनतेला कायद्याचे धडे देणाऱ्या कर्नाटकी पोलिसांनी करवेच्या गुंडांना मात्र अभय देत नेहमीसारखीच बघ्याची भूमिका घेतली. सीमाभागात संतापाची लाट उसळली असून उद्या बेळगाव बंदची हाक दिली आहे.