ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासकीय आधारभुत किंमत खरेदी योजना भरडधान्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन शेतकरी नोंदणीस मुदतवाढ

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

महाराष्ट्र राज्य मार्केटींग फेडरेशन ही संस्था राज्य शासनाची मुख्य अभिकर्ता संस्था म्हणून खरेदीचे काम पाहते. हंगाम 2021-22 करीता शासनाचे एफ.ए.क्यू. प्रतीच्या धान (भात) करीता 1 हजार 940 व नाचणी 3 हजार 377 प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. हमीभावाने धान/नाचणी शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करावयाची असणाऱ्या शेतकऱ्यांकरीता विक्रीसाठी जिल्हा मार्केटींग कार्यालयामार्फत 8 ठिकाणी खरेदी केंद्र सुरू केली आहेत. शेतकऱ्यांच्या नोंदणीची मुदत 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा मार्केटींग अधिकारी सी.डी.खाडे यांनी दिली.

खरेदी केंद्रे याप्रमाणे- चंदगड तालुका खरेदी विक्री संघ -तुर्कीवाडी. चंदगड तालुका सहकारी कृषिमाल फलोत्पादन संघ- अडकूर. आजरा किसान सहभात खरेदी विक्री संघ – आजरा, राधानगरी तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ – राधानगरी. भुदरगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ- गारगोटी (भुदरगड). दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, कोल्हापूर. कोल्हापूर जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघ, कोल्हापूर -बामणी तालुका कागल. राधानगरी तालुका ज्योतिर्लिंग सहकारी भाजीपाला खरेदी विक्री संघ, राशीवडे मार्फत पणोरी तालुका राधानगरी. धान/नाचणी खरेदी ही शासनाच्या ऑनलाईन पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांना या धान/नाचणी खरेदी केंद्रावर धान/नाचणी विक्री करायची आहे. अशा शेतकऱ्यांनी प्रथम या खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. नोंदणी करीता शेतकऱ्यांनी चालू हंगाम 2021-22 मधील धान (भात) नाचणी पिक लागवडीची ऑनलाईन नोंद असलेला डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा व 8-अ चा मूळ उतारा प्रत, आधारकार्ड व बँक पासबुक झेरॉक्सची आवश्यकता आहे.

शेतकरी नोंदणीची मुदत 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली असून ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केली नाही, त्यांनी त्वरीत या 8 संस्थेच्या कार्यालय अथवा मार्केटिंग कार्यालय, कोल्हापूर श्री शाहू मार्केट यार्ड, कांदा बटाटा लाईन, कोल्हापूर तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, गडहिंग्लज येथील बाजार समितीच्या कार्यालयाशी तसेच तालुक्याच्या सहाय्यक निबंधक कार्यालय अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks