ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूडमध्ये शिवप्रेमीतर्फै “शिवप्रताप दिन” उत्साहात साजरा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगूड बाजारपेठेतील शिवप्रेमिच्या वतीने ३६२वा “शिवप्रताप ” दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन श्री. अमर गिरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी बोलतानां ते म्हणाले १६५९ साली स्वराज्यावर अफझलखानाच्या रूपाने मोठे संकट आले . छत्रपती शिवरायानीं ध्यैर्याने व युक्तीने अफझलखानाचा वध केला. आणि स्वराज्यावरील संकटाचा धोका टळला . याचे स्मरण म्हणून हा दिवस ” शिवप्रतापदिन ” म्हणून साजरा केला जातो. यावेळी धोंडीराम परीट (जय महाराष्ट्र) यांनीही छ .शिवरायांच्या एकेक शौर्याच्या आठवणीनां उजाळा दिला.

या शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमास विशाल मंडलिक , उद्धव मिरजकर , अमित दरेकर , तानाजी कुडवे , शिवाजी चित्रकार , पिंटू रणवरे , श्री. व्यापारी नागरी सह . पत . संस्थेचे चेअरमन किरण गवाणकर , शशी दरेकर , गौरव मोर्चे , औकार दरेकर , व शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks