श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर काॅलेज, कागल येथे निबंध लेखन स्पर्धा संपन्न.

प्रतिनिधी /कागल
६ डिसेंबर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त “संविधान साक्षरता अभियान ” अंतर्गत निबंध लेखन स्पर्धाचे आयोजन श्री शाहू हाय. ज्युनिअर काॅलेज, कागल येथे करण्यात आले. ज्युनिअर काॅलेज व बार्टी समतादुत कागल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत निबंध स्पर्धेत ४३ विद्यार्थी सहभागी होते. याप्रसंगी उपप्राचार्य बी.के.मडिवाळ , बार्टी समतादूत कागलचे किरण चोैगुले व सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.
संविधान काळाची गरज, संविधान आणि शिक्षण, संविधान आणि समाज, संविधान आणि लोकशाही या विषयावर निबंध लेखन स्पर्धा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेतून घेण्यात आली.विद्यार्थींच्या मध्ये संविधान विषयी जागृती व्हावी व लोकशाहीला बळकटी मिळावी हा निबंध लेखन स्पर्धेचा हेतू होता. या कार्यक्रमासाठी प्राचार्य जे.डी.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा. एम.बी.पाटील ,प्रा व्ही. एल. शिंदे व प्रा. सोै.एस.एस.पाटील यांनी या स्पर्धेचे नियोजन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन बार्टी चे महासंचालक मा. धम्मज्योती गजभिये कोल्हापूर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मा. विशाल लोंढे कोल्हापूर जिल्हा प्रकल्प अधिकारी मा. गणेश सवाखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.