ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर विमानतळाचा गौरव ; सर्वांत जास्त मार्गांवर सेवा देणार्या विमानतळांत समावेश

कोल्हापूर प्रतिनिधी :
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योेतिरादित्य शिंदे यांनी कोल्हापूर विमानतळाचा सोमवारी गौरव केला. ‘उडान दिवसा’निमित्त वीर सुरेंद्र साई विमानतळ, झारसागुडा, ओडिशा येथे आयोजित कार्यक्रमात उडाण योजनेंतर्गत सर्वांत जास्त मार्गांवर सेवा देणार्या पाच विमानतळांचा सन्मान करण्यात आला. झारसागुडासह पेंगाँग (मेघालय), म्हैसूर (कर्नाटक) आणि जैसलमेर (राजस्थान) यांसह महाराष्ट्रातून कोल्हापूर विमानतळाला हा बहुमान मिळाला आहे.