ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आज शुक्रवार दि.१९ रोजी श्री क्षेत्र दत्त मंदिर शेणगांव येथे कार्तिक स्वामी दर्शन योग.

गुरूवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजीच्या मध्यरात्री म्हणजेच शुक्रवार रोजीच्या पहाटे ०१.२९ मिनिटांपासून ते शुक्रवार दिनांक १९ नोव्हेबर रोजीच्या दुपारी २.२८ मिनिटापर्यंत हा दर्शनयोग असल्याचे येथील क्षेत्रोपाध्याय महेश कुलकर्णी यांनी या संबंधाने माहिती देताना सांगितले.

गारगोटी :

सुमारे दिड हजार वर्षाचा इतिहास असलेल्या शेणगांव (ता भुदरगड जिल्हा कोल्हापूर ) येथील साक्षात भगवान दत्तात्रयांच्या या विश्रांती स्थळी शुक्रवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२१ रोजी त्रिपुरारी पौर्णिमेच्या मुहुर्तावर कार्तिक स्वामी दर्शन योग आहे.याच ठिकाणी दत्त प्रभुंची दुर्मिळ एकमुखी सहा हाताची उभी काळे पाषाण मुर्ती विराजमान आहे.या दैवताच्या शेजारीच दक्षिणाभिमुख कार्तिक स्वामींची सहा मुखी बारा हातांची मोर वाहनावर आरूढ झालेली काळे पाषण मुर्ती रेखीव स्वरूपात उभी आहे.बारमाही दुथडी भरलेल्या वेदगंगेच्या पवित्र शुक्लतिर्थावर निसर्गाच्या समृध्द सानिध्यात या ठिकाणचे हे दर्शन भाविक भक्ताचे समाधान करते असा येथे येणाऱ्या भाविकांचा विश्वास आहे.भगवान दत्तात्रयांच्या सर्व अवतारी सत्पुरूषांनी या विश्रांती स्थळाला वारंवार भेटी देवून सद्गती प्राप्त करून घेतली आहे.अशा दिक्षाभुमीला हा कार्तिक स्वामींचा दर्शन योग म्हणजे भाविक भक्ताला मिळालेली मोठी पर्वणी आहे असे मत येथील क्षेत्रोपाध्याय महेश कुलकर्णी यांनी याप्रसंगाने व्यक्त केले.

गुरूवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजीच्या मध्यरात्री म्हणजेच शुक्रवार रोजीच्या पहाटे ०१.२९ मिनिटांपासून ते शुक्रवार दिनांक १९ नोव्हेबर रोजीच्या दुपारी २.२८ मिनिटापर्यंत हा दर्शनयोग असल्याचे येथील क्षेत्रोपाध्याय महेश कुलकर्णी यांनी या संबंधाने माहिती देताना सांगितले.

या बध्दल अधिक माहिती देताना या शेणगांव क्षेत्राचे हे क्षेत्रोपाध्याय पुढे म्हणाले की,”कार्तिक महिणा, कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याचा योग चांगला असतो. कार्तिक स्वामी हे बल,बुध्दी, साहस आणि यशस्वितेचे प्रतिक मानले गेले आहे. कार्तिक स्वामी शिवगणांचा सेनापती म्हणून ओळखले जातात. त्यामूळे यश, ज्ञानसंपन्नता आणि शुभ गुणांचे अधिपत्य कार्तिक स्वामीकडे जाते.

क्षेत्रोपाध्याय महेश कुलकर्णी आणखी पुढे म्हणाले की, ” कार्तिक स्वामी हे ब्रम्हचारी असल्याने दर्शनाच्या वेळी त्यांना दंड, पाण्याने भरलेला कमंडलू, २७ रूद्राक्षांची माळ, दर्भ, कमळाचे फूल किंवा कोणतेही पांढरे फूल अर्पण करण्याची प्रथा आहे.आर्थिक अडचणीत, कर्जात बुडालेल्या व्यक्तींनी या पर्वणी काळात कार्तिक स्वामींचे अवश्य दर्शन घेवून प्रार्थना केल्यास आगामी वर्ष हे आर्थिक लाभाचे जाते असा पुर्वापार समज चालत आला आहे.इतर वेळी कार्तिक स्वामींचे दर्शन हे पौराणिक संदर्भानुसार सर्व स्त्रियांना वर्ज्य असते मात्र या पर्वणी काळात स्त्रियांना या दर्शनाचा लाभ हा वर्षभर घेतलेल्या देवदेवतांच्या दर्शनाईतका तुल्यबळ असतो.

येथील देवस्थान समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थ, भक्तांनी या दर्शन योगासाठीची जय्यत तयारी केल्याने या दत्त मंदिर क्षेत्र स्थळाला कोरोना नंतर दोन वर्षांनी यात्रेचे स्वरुप येण्याची चिन्हे आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks