मुरगुड : दुप्पट दर घेणाऱ्या वडापवाल्यांवर कारवाई करा; भीम आर्मी संघटनेच्या पदाधिकाऱ्याची मागणी

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
राज्यात एसटी बंदच्या काळात वडापवाल्यांनी दररोज मनमानी दरवाढ करून सर्वसामान्य जनतेची लूट चालवली आहे. मुरगूड-निपाणी असो किंवा मुरगूड ते मुंबई असो, वडाप करणाऱ्या सर्व गाड्या दुप्पट दर घेत आहे. ही सर्वसामान्य जनतेची पिळवणूक सुरू आहे. एकीकडे कोरोणाच्या धास्तीने लोकांचा जीव मेटाकुटीला आलेला आहे. तसेच दिवाळी सण नुकताच पार पडला. लोकांची ये-जा प्रमाणात सुरु आहे. त्यातच राज्यात आंदोलनामुळे एसटी बंद आहे. याचाच फायदा घेत वडाप करणारे, ट्रॅव्हल्स वाले प्रवाशांकडून दुप्पट दर वसूल करत आहेत. ही खाजगी दरवाढ जीवघेणी म्हणावी लागेल. अशी दरवाढ करणाऱ्यावर कारवाई करावी, अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. भीम आर्मी जिल्हा सचिव बाळासो कांबळे, दिलीप कांबळे, अजित कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एम. टी. सामंत, राहुल कांबळे यांनी मुरगूड पोलिसांना निवेदन दिले आहे हे निवेदन पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांनी स्वीकारले.