शाहू ग्रुप अंतर्गत श्री. छत्रपती शाहू सहकारी कृषिपूरक व ऊस तोडणी वाहतूक संस्थेची निवडणूक बिनविरोध

कागल प्रतिनिधी :
येथील श्री छत्रपती शाहू ग्रुप अंतर्गत श्री छत्रपती शाहू सहकारी कृषिपूरक ऊस तोडणी- वाहतूक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री.यु.ए.माने यांनी काम पाहिले.
२०२१-२०२६ या सालासाठी ही निवडणूक प्रक्रिया झाली. सहकारातील आदर्श व्यक्तिमत्व स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे संस्थापक असलेल्या या संस्थेची धुरा सध्या शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे समर्थपणे सांभाळत आहेत. एकूण दहा सदस्य संख्या असलेल्या या संस्थेत नव्या चार चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.या निवडणुकीच्या माघारीच्या दिवशी निवडून द्यावयाच्या जागे इतकेच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले.त्यामुळे निवडणूक अधिकारी श्री.माने यांनी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
बिनविरोध निवड झालेल्या नूतन संचालकांची नावे अशीः
समरजितसिंह विक्रमसिंह घाटगे(शिंदेवाडी),शिवगोंडा बाळगोंडा पाटील(कागल), नारायण रामजी पाटील(बामणी) ,विजय कल्लाप्पा बोंगाळे(कागल ), मारुती ज्ञानदेव पाटील(पिंपळगाव बु), रविराज विठ्ठल पाटील(कोल्हापूर ), लक्ष्मण कृष्णा खोत(व्हन्नूर ), मारुती दादू आंगज(कागल), सिताराम अमृता कांबळे(कागल), विलास हरी गुरव(मुरगुड).