ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारावीच्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्याच्या तारखा जाहीर, वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

टीम ऑनलाइन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावीच्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्यासाठीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे

बारावीच्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्याच्या तारखा :

उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थी, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांचे अर्ज 3 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.

विलंब शुल्कासह हे अर्ज 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत भरता येतील. तर, उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी 12 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2021 असा आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावेत

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks