करवीर तालुक्यात दिड हजार एकर क्षेत्रातील ऊस पीके करपली

सावरवाडी प्रतिनिधी :
थकीत बीले भरलेली नाहीत . पुरकाळात जळालेल्या विद्युत डेपीची अद्याप दुरुस्ती नाहीत .सहकारी तत्वावर चालणाऱ्या पाणी पुरवठा संस्थेंचा अनागोंदी कारभार . पाणी वाटपात स्थानिक राजकारणाचा होणारा हस्ताक्षेप आणि गटबाजी . पाणीपट्टी भरून ही शेतीला पाणी मिळत नसल्याने करवीर तालुक्यातील दीड हजार एकर शेतीतील ऊस पीक वाळलेली आहे .कोट्यावधी रुपयांचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी कडू झाली
ग्रामीण भागात साखर कारखाण्यांचे ऊस गळीत हंगाम सुरु असतांना गेल्या एक महिन्या पासून पाणी पुरवठा संस्था सुरु झाल्या नाहीत .त्याचा परिणाम ऊस शेतीवर झाला आहे . ग्रामीण भागातील सहकारी तत्वावर चालणाऱ्या पाणी पुरवठा संस्था ठरावीक स्थानिक राजकिय गटात विखुरल्याने पाणी वाटपात पक्षपातीपणा सुरु आहे. शेतक-यांनी पाणी पट्टी भरूनही शेतीला पाणी मिळत नाही . शेतीला पाणी द्या नाहीतर एकरी सव्वा लाख रुपये नुकसान भरपाई द्या अशी मागणी ऊस उत्पादक बागायतदार शेतकऱ्यांनी केली आहे .
करवीर तालुक्यात दीड हजार एकर शेती मधील ऊस पीके वाळल्याने करवीर तालुक्यात होणार्या निवडणूकांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे . वाळलेल्या ऊसाला जबाबदार कोण आहे याची चौकशी शासनाने करावी अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली.