गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : २० लाखांचे भेसळयुक्‍त तेल, खाद्यपदार्थ जप्‍त

कोल्हापूर:

अन्‍न-औषध प्रशासनाने भेसळखोरांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर टाकलेल्या छाप्यात दूध पावडर, खवा, तेलासह अन्य साहित्यामध्ये भेसळ केल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यातून तब्बल 20 लाख 29 हजार 603 रुपयांचे भेसळयुक्‍त खाद्यपदार्थ जप्त केले आहेत.

सणासुदीमध्ये बर्फी, मोदक मिठाईला मोठी मागणी असते. यातील बहुतांश खाद्यपदार्थ खवा व दुधापासून तयार केले जातात. पण गेल्या काही वर्षांपासून सर्वत्र भेसळयुक्‍त खव्याची विक्री होत असल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. राज्यात दररोज सुमारे सात ते आठ हजार किलो भेसळयुक्‍त खव्याची विक्री केले जात असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

अन्‍न व औषध प्रशासनाने छापे टाकून भेसळ माफियांचा ‘बाजार’ उठविण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील हेरवाड (ता. शिरोळ) येथील बालाजी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट येथून खवा बनविण्यासाठी वापरली जाणारी व्हे पावडर (किंमत दोन लाख 31 हजार 768 रुपये) जप्‍त केली आहे. व्हे पावडर साठवणुकीची जागा अस्वच्छ होती. मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील गणेश मिल्क प्रॉडक्टवर टाकलेल्या छाप्यात 2 लाख 90 हजार 320 रुपयांचे भेसळयुक्‍त पदार्थ जप्त करण्यात आले.

यात भेसळयुक्‍त स्किम्ड मिल्क, खवा, विनालेबलची पांढरी पावडर अस्वच्छ ठिकाणी ठेवलेली आढळली. टाकवडे (ता. शिरोळ) येथील शिवरत्न मिल्क अँड अ‍ॅग्रो प्रॉडक्ट येथे 11 लाख 37 हजार 458 रुपयांचे भेसळयुक्‍त स्किम्ड मिल्क पावडर, खवा, एस.एम.पी. आणि व्हे पावडर सापडली. आकिवाट (ता. शिरोळ) येथे आमावा मिल्क प्रॉडक्ट येथून 3 लाख 70 हजार 57 रुपयांचा भेसळयुक्‍त खवा, म्हशीचे दूध, पावडर, व्हे पावडर, स्किम्ड मिल्क पावडर, पाम तेलाचा साठा अन्‍न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी जप्त केला. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई केली आहे. पथकात सहायक आयुक्‍त अन्‍न व औषध एम. एस. केंबळकर, अन्‍नसुरक्षा अधिकारी अशोक कोळी, दयानंद शिर्के, मंगेश लव्हटे, विजय उनवणे, पुणे येथून आलेले अन्‍नसुरक्षा अधिकारी अशोक इलागरे, अविनाश दाभाडे, अरविंद खडके, रोहन शहा यांचा समावेश होता.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks