राजे समरजितसिंह घाटगे ” साखर उद्योग गौरव” पुरस्कार प्रदान; पुण्याच्या डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन च्या वार्षिक सभेत दिला पुरस्कार

कागल प्रतिनिधी :
येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांना डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन पुणे या संस्थेने दोनच दिवसांपूर्वी ” साखर उद्योग गौरव पुरस्कार” जाहीर होता. कर्नाटकचे मंत्री मृगेशजी निराणी यांचे शुभ हस्ते तो आज राजे समर्जीतसिंह घाटगे यांनी सन्मानपूर्वक स्वीकारला.यावेळी व्यासपीठावर साखर आयुक्त माननीय शेखर गायकवाड, एस एस इंजिनियर चे शहाजी भड, सोहन शिरगावकर, प्रकाश नाईनवरे ,एन एस आय चे संचालक नरेंद्र मोहन अग्रवाल, आरती देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
गेस्ट ऑफ ऑनर म्हणून केंद्रीय मिस्टर नितीन गडकरी ऑनलाइन मार्गदर्शन केले.
श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून श्री. घाटगे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता.
डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या वार्षिक सभेत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
सहकारी साखर कारखानदारीमध्ये आदर्श ठरलेल्या व स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे संस्थापक असलेल्या येथील शाहू कारखाना आज पर्यंत राष्ट्रीय व राज्य पातळीवरील 64 पुरस्कार मिळालेले आहेत. राजे समरजितसिंह घाटगे यांनी यामध्ये सातत्य राखत जवळपास नऊ पुरस्कार मिळवले आहेत.
या कारखान्यास नुकताच राष्ट्रीय साखर महासंघाकडून गत हंगाम 2020 -21 करिता उच्च साखर उतारा विभागातील देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.आणि लगेचच त्यांना मिळालेला साखर उद्योग गौरव पुरस्कार म्हणजे ते शाहु साखर कारखान्यासाठी देत असलेल्या योगदानाची पोहच पावती आहे.
स्व.राजेसाहेब यांची आठवण
समर्जीतसिंह घाटगे म्हणाले,डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सभेच्या स्टेजवरून शाहू कारखान्याने अनेक पुरस्कार स्वीकारलेले आहेत. काही पुरस्कार स्वीकारताना माझे वडील स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या बरोबर होतो. आज मला त्यांची आवर्जून आठवण झाली. आज हा वैयक्तिक स्वरूपाचा पुरस्कार मला मिळाला हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. याचे सर्व श्रेय माझे वडील स्व.राजे साहेब व कारखान्यांचे सर्व सभासद ऊस उत्पादक शेतकरी यांना देतो कारण सभासदांचे सहकार्य आणि राजसाहेबांची शिकवण यामुळेच हे शक्य झाले आहे.