ताज्या बातम्यामहाराष्ट्र
स्वयंभु दूध संस्था घोटवडे संस्थेच्या वतीने सभासदांना दिपावली भेट आणि दूध लाभांश वाटप

कौलव प्रतिनिधी :
स्वयंभू दुध संस्था घोटवडे यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे सन २०२०–२०२१सालाचा दुध फरक म्हैस दुध प्रतिलिटर ५.६०रु तर गाय दुध प्रतिलिटर २.५०रु प्रमाणे तसेच दिपावली भेट म्हणून २किलो साखर,साबण,उटणे,वासाचे तेल वाटप भोगावती साखर कारखान्याचे मा चेअरमन धैर्यशील पाटील(कौलवकर)यांच्या हस्ते करणेत आले स्वागत आणि प्रास्ताविक मयुर डोंगळे यांनी केले.. संस्थेचे चेअरमन संजय डोंगळे यांनी सर्व सभासदांना आणि ग्रामस्थांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी .कौलवचे प्रतिष्ठित नागरिक आनंदा कोंडी पाटील सर्व संचालक मंडळ ,दत्तात्रय कातीवले,सखाराम लोकरे,आनंदा हालके,भिकाजी डोंगळे,उत्तम डोंगळे,शंकर डोंगळे,एम आर पाटील,रामचंद्र सुतार,विकास डोंगळे,अशोक डोंगळे आदीसह सभासद ,ग्रामस्थ उपस्थित होते.आभार सचिव नामदेव डोंगळे यांनी मांडले .