शिक्षकांचा सन्मान हाच संस्कृतीचा व ज्ञानाचा सन्मान : प्राचार्य जे .बी.बारदेस्कर

चंदगड :
समाजाचा विकास सत्तेने होत नाही . यंत्राने होत नाही. तर तो आदर्श शिक्षकांमुळेच होत असतो . शिक्षक हे संस्कृती संवर्धनाचे साधन आहे . तर शिक्षक हे संस्कृतीचे साधक आहेत . शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा व ज्ञानाचा सन्मान आहे असे विचार साधना शिक्षण समुह गडहिंग्लजचे सचिव *प्राचार्य जे.बी .बारदेस्कर* यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ चंदगडच्या वतीने म.फुले विद्यालय व गुरू.म. भ. तुपारे ज्युनि . कॉलेज कार्वे येथे मुख्याध्यापकांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभात प्रमुख वक्ते म्हणून व्यक्त केले . . अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य आर.आय . पाटील होते . चंदगड पंचायत समितीचे सभापती अॅड . अनंत कांबळे व शिक्षण विस्तार अधिकारी एम.टी . कांबळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते .
प्रास्ताविक व्ही .के. फगरे यांनी करून चंदगड तालुका मुख्याध्यापक संघाचा आढावा घेतला . कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे संचालक जी.एम. पाटील यांनी पाहूण्यांचा परिचय करून दिला . कार्वे शैक्षणिक संकूलाचे शालेय समितीचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष इंजि.एम.एम. तुपारे यांनी उपस्थितांचे स्वागत करून सेवानिवृत्त मुख्याध्यापकांना शुभेच्छा दिल्या . यावेळी आर.बी. पाटील , एन.आर . पाटील , पी.बी. पाटील, डी.के. कदम , एस .व्ही. गुरबे , एस. डी. फडके , ए .जी . कुसाने , एस.आर. पाटील , ए . एस. पाटील , ए.एन. दळवी , व्ही.एस . कार्वेकर , आय .के. स्वामी , पी.एम .टक्केकर , व्ही . एन . देसाई , ए .झेड . गावडे , डी.एस. सिनगारवाडी , वाय. व्ही . कांबळे , एल.एम .ढेकोळकर, एस .एस. देवरमनी, आर .एस . देसाई , एम.आर. यरगट्टी , सौ .एस.जे. पाटील , एम.ए. बाणेकर या सेवानिवृत्त झालेल्या २३मुख्याध्यापकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते शाल, पुस्तक , पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला . यावेळी पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक पी.जे . मोहनगेकर यांना परिवर्तन फौंडेशनचा शाहू प्रेरणा पुरस्कार, एम .आर . भोगुलकर व एस.एन. पाटील यांना डॉ . घाळी उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार, ए .के . पाटील यांना गुरुवर्य बी.जी. काटे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्या बध्दल मुख्याध्यापक संघटनेमार्फत सत्कार करणेत आला . यावेळी सत्कारमूर्ती वाय . व्ही . कांबळे , एस.व्ही . गुरबे , ए.एस.पाटील ,एस .एस.देवरमणीव अमृत देसाई यांनी आपली मनोगते व्यक्त केली . शिक्षण विस्तार अधिकारी एम.टी . कांबळे यांनी संघटनेचे महत्त्व विशद करुन सेवानिवृत्ती नंतरच खऱ्या आयुष्याला सुरुवात होते व उत्तम काम करता येते . त्यासाठी मन आणि विचार तरूण ठेवा असा संदेश दिला . प्रमुख अतिथी अॅड . अनंत कांबळे यांनी निवृत्त होणारा शिक्षक आपल्या शिक्षकांची आदराने नावे घेतो , आणि हेच खरे संस्कार आहेत . सेवानिवृत्तिनंतर आपले जीवन सुसहय , आनंदी होण्यासाठी कोणतीतरी कला जोपासा . जीवन कसं जगायच ते तुम्हाला कला शिकवील , संगीतामध्ये काय सामर्थ्य आहे हे विविध दाखले देऊन स्पष्ट केले व सर्व सेवानिवृतांना शुभेच्छा दिल्या .
प्रमुख वक्ते प्राचार्य जे. बी.बारदेस्कर यांनी शिक्षणक्षेत्र हे असे क्षेत्र आहे की जिथे शिक्षक सेवानिवृत्त होईपर्यंत विद्यार्थ्यांच्या वयाचा असतो . सेवानिवृत्तीनंतर काम करा नाहीतर काम थांबलं की माणूस म्हातारा होतो . दुसऱ्याला जगण्याच ज्ञान देणारा हाच खरा गुरुवर्य असतो हे स्पष्ट करून सर्व गुरुजनांना शुभेच्छा दिल्या . अध्यक्षिय भाषणात प्राचार्य आर.आय. पाटील यांनी स्वतंत्रपणे विचार करण्याची कुवत असणारा विद्यार्थी घडविणे हेच शिक्षणाचे उद्दिष्ट असून ज्या देशाची शिक्षण पद्धती प्रभावी तोच देश प्रगती करतो .
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष एम.बी. पाटील , सचिव पी.जे . मोहनगेकर, खजिनदार डी.जी. कांबळे , , एस.आर. पाटील , सौ .ए.ए. देवण , एन.एस . पाटील , जी .व्ही. गावडे, कार्वे विद्यालय व ज्युनि . कॉलेजचा सर्व स्टाफ , संजय साबळे , आर.टी. गुंठे यांचे सहकार्य लाभले . सूत्रसंचालन सौ .जी.एस . मुरकूटे व सौ .एस.ए. बागी यांनी केले .आभार प्राचार्य एम.एम . गावडे यांनी मानले .यावेळी इंजि, एम एम तुपारे, अॅडओकेट अनंत कांबळे,प्राचार्य आर आय पाटील व मान्यवर उपस्थित होते.