आजरा येथील फैजान नाईकवाडे याची मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून निवड

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
आजरा सुतार गल्ली येथील फैजान अमीन नाईकवाडे या विद्यार्थ्यांची जागतिक स्तरावरील मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून निवड झालेने तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याचे दहावीपर्यंत चे शिक्षण राधाबाई राधाबाई इंग्लिश मेडीअम स्कुल कोल्हापूर येथे झाले असून ज्युनिअर कॉलेज चे शिक्षण विज्ञान मधून संजय घोडावत इन्स्टिट्युट अतिग्रे येथे झाले आहे जे ई ई परीक्षेच्या माध्यमातून आय आय टी जोधपूर येथे नावाजलेल्या संस्थेत बी टेक ,इलेक्ट्रीकल इंजिनीअर साठी त्याची निवड झाली कॅम्पस मुलाखत व इतर ऑनलाइन टेस्ट च्या माध्यमातून मायक्रोसॉफ्ट या जागतिक स्तरावरील कंपनिकडून त्याची आकर्षक वेतनावर निवड झाली असून आजऱ्यातील पहिले मिडल स्कुल स्कॉलरशीप ची मुलांची विशेष तयारी करून घेणारे नाईकवाडे गुरुजी यांचा फैजान हा नातू होय त्याला यासाठी कॉलेज चा सर्व शिक्षक स्टाफ, आजी श्रीमती रोशन , वडील अमीन, आई प्राध्यापक सौ नफिसा, काका व आत्या यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.