रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी प्रस्ताव : पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर जिल्ह्यात खून,मारामारी, छेडछाड आणि बलात्कारा सारख्या वाढणाऱ्या घटना लक्षात घेऊन पोलिसांकडून त्याची वर्गवारी सुरु आहे. रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून खून, मारामारी,छेडछाड, बलात्कार यासारख्या घटनांमध्ये वाढ़ झाल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान खून, मारामारी, विनयभंग, बलात्कार या गुन्ह्यांची वर्गवारी केली जात असून शेतीचे वाद, दारूच्या नशेत भांडणे यातून जवळ जवळ 40 टक्के गुन्हे दाखल झालेत, तर रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून सुमारे 15% गुन्हे झाले असून अशा गुन्हेगारांना मोका अंतर्गत कारवाई करण्यासंबंधीचा प्रास्ताव तयार करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.