ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर : अश्लील फोटो द्वारे ५ लाखांच्या खंडणीसाठी व्यापार्याला धमकी

कोल्हापूर :
पाच लाखांच्या खंडणीसाठी पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील व्यापार्याला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देणार्या सातारा येथील संशयिताला वडगाव पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी सापळा रचून बेड्या ठोकल्या. कमलाकर यशवंत मुळे (वय 33, रा. मंगळवार पेठ, सातारा, सध्या हनुमान मंदिरजवळ, वडगाव) असे त्याचे नाव आहे. थंड डोक्याने खंडणीसाठी कट रचून खंडणीखोराने व्यापारी कुटुंबाला हैराण करून सोडले होते. संशयिताकडे उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात त्याने गुन्हे केले असावेत, असा संशय पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी व्यक्त केला. उद्या त्यास न्यायालयात हजर करण्यात येत आहे.