श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना व राजे बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून उच्चांकी बोनसबद्दल पेढे वाटून आनंदोत्सव समरजितसिंह घाटगे यांचा केला सत्कार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

कागल, प्रतिनिधी : विजय मोरबाळे
येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसाठी २१ टक्के तर राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना २५ टक्के इतका उच्चांकी बोनस जाहीर झाला.शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांनी जाहीर केला. याबद्दल शाहू साखर कारखाना व राजे बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने येथील ग्रामदैवत गहिनीनाथ गैबीपीर व श्रीराम मंदिर येथे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज व स्व.विक्रमसिंहजी घाटगे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले .फटाक्यांची आतषबाजीही केली.चांगला बोनस देऊन कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली. त्याबद्दल श्री घाटगे यांचा सत्कार केला.
या वेळी शाहू साखर कामगार संघटनेचे सचिव बाळासाहेब तिवारी म्हणाले, कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी शाहू साखर कारखान्यामध्ये सभासद शेतकरी व कर्मचारी यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले.उच्चांकी ऊस दराप्रमाणे त्यांनीच कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त चांगला बोनस देणेची परंपरा निर्माण केली आहे.हीच परंपरा विद्यमान चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे पुढे चालवीत आहेत.
कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे यांनी कारखाना सुरू झाल्यानंतर अवघ्या तिसऱ्या वर्षी वेतन आयोग लागू केला होता. त्यावेळी साखर संघ किंवा शासनाची तशी कोणतीही अट नव्हती. तरीही कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत राज्यात सर्वप्रथम क्रांतीकारी निर्णय त्यांनी घेतला .आजही कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे पगार नियमित व वेळेत होतात.कर्मचाऱ्यांची कोणतीही देणी थकीत नाहीत.कर्मचाऱ्यांसाठी मेडिक्लेम योजना, वाचनालय सुविधा, सवलतीच्या दरात कॅन्टीन व साखर सुविधा पुरविण्यात येत आहेत.कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी शाहू परिवार वार्ता हे हाऊस मॅगझीन सुद्धा सुरू करण्यात आले आहे. कारखान्याच्या सभासदांना प्रमाणेच कर्मचाऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आलेली आहे. साखर संघ व शासन पातळीवर आजपर्यंत जे वेतन करार कर्मचाऱ्यांसाठी झालेले आहे. ते सर्व सर्वप्रथम शाहू साखर कारखाने लागू करून घेतलेले आहेत. तसेच त्याचा फरक सुद्धा ज्या त्या वेळी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला आहे.
यावेळी महादेव करिकट्टे,बाळू हेगडे,सागर परीट यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी कामगार संघटना नूतन अध्यक्ष कृष्णात चव्हाण माजी अध्यक्ष मारुती अंगज यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते
राजे समरजितसिंह घाटगे कोट
शाहू साखर कारखान्यासह शाहू ग्रूपमधील सर्वच संस्थांमध्ये व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामध्ये नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले आहेत. कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी सभासद शेतकरी,ग्राहक,ठेवीदार,कर्जदार व कर्मचारी यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. शाहू शाहू ग्रुपचा नावलौकिक देशपातळीवर होत आहे व्यवस्थापनास सभासदाने केलेले सहकार्य बरोबरच व्यवस्थापनाच्या नियोजनास कर्मचाऱ्यांनी दिलेली प्रामाणिक कष्टाची जोड कारणीभूत आहे. त्यामुळे त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांची परंपरा यानिमित्ताने मी पुढे चालवित आहे. याचा मला अभिमान आहे.