ताज्या बातम्या

नेसरी वाचन मंदिर मध्ये शोकसभा

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार

नेसरी वाचन मंदिर नेसरी येथे नेसरीचे दिवंगत सुपूत्र कै.डॉ.एस्. डी.पाटील व कै. विलासराव शंकराप्पा बागी याअभ्यासू,तज्ञ व सेवाभावी विचारवंतांच्या आठवणींना उजाळा देत, श्रद्धांजली वाहणे करिता ग्रंथालयात शोकसभा आयोजित करण्यात आली होती. आरंभी या दोन्ही विचारवंतांच्या प्रतिमांचे पूजन प्रा. निचळ व श्री बाबूराव गुरबे, महादेव साखरे यांनी केले. प्रास्ताविक प्रा.मटकर यांनी केले.प्रा.व्ही.जी.कातकर यांनी डॉ. एस्. डी. च्या विद्यार्थी दशेपासून ते एका पेक्षा एक मोठ्या पदावरील संधी डावलून अखेर शिक्षण क्षेत्राची निवड केली.या क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीस तोड नाही. अभ्यासू मार्गदर्शक, शिक्षकांचा शिक्षक होणार नाही.असे प्रतिपादन केले. त्याचबरोबर एक कर्तव्य-दक्ष उद्योजक, संयोजक, मार्गदर्शक आणि प्रायोगिक शेतीचे पुरस्कर्ते म्हणून आपलीओळख निर्माण करणारे स्वर्गीय – विलासराव शंकराप्पा बागी याअभ्यासू मार्गदर्शकाची तुलना दीपस्तंभाशी केली. वक्तशीरपणा, शिस्त आणि नम्रता या बरोबरच कर्तव्य-दक्षता हे विलास आण्णांच्या ठीकाणी असणारे गुण आजकाल नामशेष होत आहेत.

वडील शंकराप्पाण्णा बागी यांचा वसा जोपासत व्यापार व उद्योग याचबरोबर सहकार क्षेत्रातील त्यांची कामगिरी उत्तुंग आहे. अशा या समाजासाठी योगदान देणाऱ्या या महान पूत्रा नां आपण विसरू शकत नाही. यावेळी प्रा.एस्.एस्.मटकर,प्रा.राजगोळकर,डॉ. सत्यजित देसाई, बाबूराव गुरबे,महादेवआण्णा साखरे, सौ. जयश्री वळगडे, शिवाजीराव हिडदुगी, कार्यवाह वसंत पाटील यांनी आठवणींना उजाळा दिला. रवी हिडदुगी यांनी आभार मानले. एक मिनिट स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ग्रंथालयाचे संचालक चंद्रकांत वनकुद्रे, टी. बी. कांबळे, सेवानिवृत्त कर्मचारी विचार मंच नेसरी चे उपाध्यक्ष मारुतीराव रेडेकर,शिंत्रेसाहेब,इंजिनिअर प्रसाद करमळकर,गुलाबराव पाटील, अमोल बागडी, कवी कृष्णा निकम,दौलती रेडेकर, पोवाडी मठपती, फ्रान्सीस डिसोझा, शिवाजी देसाई, सपाटेसर, आनंदा कोकितकर, हर्षवर्धन सुतार, श्री. अत्याळी इ. मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे नियोजन रविंद्र कुंभार, ग्रंथपाल सौ.शितल शिंदे व सौ. माधुरी कुंभार यांनी केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks