निधन वार्ता
बहिरेश्वर येथील पेंटर संभाजी बचाटे यांचे निधन

सावरवाडी प्रतिनिधी :
करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथील वारकरी ह.भ.प संभाजी गोपाळा बचाटे (वय वर्ष ७२) यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
ते उत्कृष्ट प्रकारचे पेंटर म्हणून नावजले होते. त्यांना भिंतीवर चित्र काढण्याची कला अवगत होती. कोटेश्वर विकास सेवा संस्थेचे माजी संचालक व श्री कृष्ण दूध संस्थेचे ते माजी व्हा.चेअरमन होत. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दिनांक २७ रोजी आहे.