ताज्या बातम्यामहाराष्ट्र

१ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर कसबा बीड ते जिल्हाधिकारी कचेरी पायी दिंडी आंदोलन

सावरवाडी प्रतिनिधी :

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा , विद्यार्थ्यांची शैक्षणिक कर्जमाफ करावीत. स्वामीनाथन आयोगाची केंद्र शासनाने अमंलबजावणी करावी . शेतकऱ्यांच्या एफआर पी ऊसबीले तुकडे न करता एक रुक्मी  शेतकऱ्यांना द्या , शेतीसाठी २४ तास वीजपुरवठा सुरू करा , आदि मागण्यासाठी करवीर तालुक्यातील कसबा बीड ते जिल्हाधिकारी कचेरीपर्यत पायी दिंडी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी  आंदोलन नेते मुंकुंद पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. 

शेतकऱ्यांच्या बारा मागण्या घेऊन राज्य शासनाला जाणीव होण्यासाठी पायी दिंडी आंदोलन उभारण्यात येत आहे . असे सांगुन मुंकुंद पाटील म्हणाले एक नोव्हेंबर रोजी कसबा बीड येथे  सकाळी आठ वाजता ऐतिहासिक आझाद हिंद झेंडा चौकातून या पायी दिंडीस  सुरुवात होईल . महे , कोगे, पाडळी खुर्द , बालिंगा ,फुलेवाडी, रंकाळा , अंबाबाई मंदीर , शिवाजी पुतळा , दसरा चौकट जिल्हाधिकारी कचेरी असा मार्गक्रम आहे जिल्हाधिकारी कार्यालया मध्ये -खरडा भाकर खाऊन निवेदन देण्यात येणार आहे .. आंदोलन शांततेच्या व लोकशाही मार्गाने होणार आहे. 

पत्रकार बैठकीला भाजप शेतकरी आघाडीचे दादासाहेब देसाई , राहूल पाटील , रणवीर पाटील , अनिल बुवा , प्रा प्रवीण पाटील , गिरीष देसाई , ओंकार पाटील आदि मान्यवर उपस्थितीत होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks