पोलीसांच्या दडपशाही विरोधात निषेध फेरी; सर्वपक्षीय रस्ता बचाव कृती समितीच्या मुरगुड बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुदाळतिट्टा – निपाणी रस्ता व्हावा.या मागणीसाठी केलेल्या आंदोलनावेळी मुरगूड पोलीसांनी दडपशाही करुन खोटे गुन्हे दाखल केल्याच्या विरोधात व आंदोलनकर्त्यांचे गुन्हे दाखल करुन घेत नसल्याच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय रस्ता बचाव कृती समितीतर्फ शहरातुन निषेध फेरी काढण्यात आली.आजच्या मुरगुड बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मुदाळतिट्टा – निपाणी रस्त्यासाठी मुरगूड येथे दि-२०रोजी रास्ता रोको आंदोलन झाले होते . त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग राधानगरी चे सहाय्यक अभियंता अमित पाटील यांनी यावेळी आपल्याला मारहाण, शिवीगाळ केल्याची तक्रार मुरगूड पोलिस स्टेशनमध्ये दिली .त्यानुसार चौघा आंदोलकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . मुरगूड पोलिसांनीच गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणल्याचे तसेच आंदोलन कर्त्यांवर मुरगूड पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत. याबरोबरच आंदोलकांनी दिलेल्या तक्रारीची पोलिस दखल घेत नाहीत असे सर्वपक्षीय रस्ता बचाव कृती समितीचे म्हणणे आहे.
परिणामी याविरोधात आज सकाळी नऊ वाजता शहरातुन सर्वपक्षीय रस्ता बचावच्या वतीने निषेध फेरी काढण्यात आली. निषेध फेरी बसस्थानकापासून नाका न १ पर्यंत व बाजारपेठेतून पोलीस स्टेशनवर नेण्यात आली .यावेळी आंदोलका वरील गुन्हे मागे घ्यावेत, रस्त्यांची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यावर मनुष्यबळाचे गुन्हे दाखल करावेत असे निवेदन सर्वपक्षीय रस्ता बचाव कृती समितीच्या वतीने इस्पुर्लीचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांना देण्यात आले . आंदोलकांच्या मागण्यांचा नि :पक्षपातीपणे तपास करून योग्य ती कारवाई करू असे आश्वासन यांनी कृती समितीला दिले आहे.
यावेळी दिग्विजय पाटील ,संतोष वंडकर, रणजीत सुर्यवंशी, विकी साळोखे, सदाशिव आंगज पिंटू पाटील, नामदेवराव मेंडके, एस व्ही चौगले, धनाजी गोधडे, सुनील मंडलिक, किरण गवाणकर, जयसिंग भोसले ,दिगंबर परीट ,राजेंद्र भाट ,अरुण ढोले, दिपक शिंदे ,भगवान लोकरे, सुशांत मांगोरे, अनिल राऊत, सुनील रणवरे ,संदीप कलकुटकी, धोंडीराम मकानदार, किशोर पोतदार ,प्रशांत शहा, राहुल वंडकर, संजय मोरबाळे, बजरंग सोनुले, विक्रम गोधडे ,विठ्ठल जाधव ,उत्तम जाधव ,अक्षय शिंदे, सोमनाथ यरनाळकर यांच्यासह शेकडो नागरिक निषेध फेरीत सामील झाले होते.