ताज्या बातम्यामहाराष्ट्र

भर रस्त्यातच बांधकाम कामगारांच्या मोर्चाला सामोरे गेले मंत्री हसन मुश्रीफ; महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचा कागलमध्ये मोर्चा; बांधकाम कामगारांच्या दिवाळी बोनससाठीही प्रयत्नशील असल्याची दिली ग्वाही.

कागल :

बांधकाम कामगारांचा कागलमध्ये निघालेल्या मोर्चाला ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ भर रस्त्यातच सामोरे गेले.

यावेळी बांधकाम कामगारांनी त्यांच्या मागण्यांवर बरोबरच मंत्री मुश्रीफ यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेने या मोर्चाचे आयोजन केले होते. महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने कामगार मंत्री श्री. मुश्रीफ यांना बांधकाम कामगार कामगारांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आपण कामगार मंत्री असताना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केले. या मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या कल्याणाच्या विविध योजना सुरू केल्या. बांधकाम कामगार बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पाठविला असल्याचेही त्यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी बांधकाम कामगारांना दिपावली बोनस दहा हजार रुपये मिळावी. व अन्य मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन केले होते.

कागल बस स्थानकापासून येथील गैबी चौकापर्यंत हा मोर्चा निघणार होता. बस स्थानका जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मोर्चा येतात. कागल येथील विश्रामगृहाततून शहरात चाललेले मंत्री मोर्चाला सामोरे गेले. व निवेदन स्वीकारले

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हा संघटक रजनीकांत माने, जिल्हाध्यक्ष सद्दाम मुजावर, जिल्हा उपाध्यक्ष केम्पान्ना हालगेकर, जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत लोंढे, महिला अध्यक्षा गीता कांबळे, सचिव रामचंद्र निकम, जिल्हा सचिव राहुल दवडते, हातकणंगले तालुकाध्यक्ष सचिन बिरांजे, इचलकरंजी शहराध्यक्ष मेहबूब गवंडी, झाकीर नाईकवाडी, हातकणंगले तालुका उपाध्यक्ष जावेद पाथरवट हातकणंगले तालुका उपाध्यक्ष विनायक सुतार आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks