विशेष लेख : संघटकीय युवा नेतृत्व – देवानंद पाटील

कोणतीही आर्थिक सुबत्ता पाठीशी नसताना केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर, साध्या
पोष्टमन चा मुलगा असलेल्या देवानंद पाटील यांनी पत्नी सौ. जयश्री सह निढोरीचे सरपंच पद भूषविण्याचा बहुमान पटकावला आहे.
निढोरीचा पहिला लोकनियुक्त सरपंच होण्याचा मान मिळवित देवानंद पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या गटात आज संघटकीय युवा नेतृत्व म्हणून नांव अधोरेखित केले आहे. नामदार साहेबांनी त्यांच्या पुरोगामी, संघटकीय नेतृत्वाला राजकारणातील सत्तेचं बळ दिल्यास त्या संधीचे सोने तर ते करतीलच शिवाय गटाचा नावलौकिक निश्चितच उंचावतील. असे अत्यंत धडाडीचे नेतृत्व असलेल्या निढोरीच्या देवानंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त…
वेदगंगेच्या काठावर वसलेल्या निढोरी-गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रबोधन हा एकमेव मार्ग लक्षात आल्यानंतर देवानंद पाटील यांनी प्रबोधनातून समाजकारण करित राजकारण करण्याची किमया करून दाखवली आहे. त्यामुळेच आज निढोरीचा चेहरा मोहरा बदलण्यात ते यशस्वी झाले आहेत. निढोरीत युवकांची फळी उभी करण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्याची प्रचिती ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत दाखवून तब्बल २७ वर्षानंतर सत्ता बदल करण्याचा करिश्माही दाखवून दिला आहे. आणि तेथूनच त्यांची यशाची, कर्तृत्वाची कमान उंचावत चालली आहे.
पुरोगामी विचारांची कास धरून सामाजिक कार्यासाठी धडपड करणारे उत्साही व्यक्तिमत्व
समाजव्यवस्थेचा गाडा पुढे नेवू शकणारे व्यक्तिमत्व म्हणून आज देवानंद पाटील यांच्याकडे पाहिले जाते.
सामाजिक कार्याची तळमळ, आजोबा कै. केदारी पाटील यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा घेवून त्यांनी अनेक सामाजिक व सहकारी संस्थांची स्थापना केली. त्यामुळे विद्यार्थी दशेपासूनच विविध प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी त्यांचा पुढाकार असायचा. देवानंद पाटील यांनी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, शाहीरी स्पर्धा, तायक्वांदो स्पर्धा यांचे आयोजन यशस्वीरीत्या केले आहे. त्यांनी मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव देण्यासाठीच्या चळवळीतही हिरीरीने भाग घेतलेला आहे.
स्व .खा.सदाशिवराव मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली १९९१-९२ पासून विद्यार्थी काँग्रेसमध्ये कुशल संघटक म्हणूनही त्यांनी
सामाजिक जीवनात झोकून देवून काम केले आहे .महिलासबलीकरणासाठी त्यांचा विशेष प्रयत्न दिसून येतो. जिजामाता महिला दूध संस्था, सावित्रीबाई फुले महिला बचतगट, रमाबाई आंबेडकर महिला मंडळ या संस्थांच्या स्थापनेत व विकासात त्यांचा मोठा हातभार लागला आहे. कै. केदारी पाटील सेवाभावी संस्था, फुले-शाहू- आंबेडकर विचार मंच, महात्मा फुले वाचनालय स्थापून शालेय विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे.
समाजकारण, राजकारणाबरोबरच प्रबोधासाठी विविध विषयावर २०० हून अधिक
व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याचा
गौरव म्हणून २००३ मध्ये आदर्श युवा गौरव पुरस्कार २००५ मध्ये दलितमित्र फुले-शाहू- आंबेडकर, २००६ मध्ये अण्णाभाऊ साठे मातंग समाजसेवक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे .
गेली काही वर्ष ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली देवानंद पाटील यांच्या विकासाभिमूख नेतृत्वामुळे निढोरी चेहरामोहरा बदलता आला आहे . येथील महादेव मंदीर ‘ ब ‘ वर्ग तीर्थक्षेत्र योजनेतंर्गत दोन कोटीचा निधी मंजूर, राष्ट्रीय पेयजल (पेरी अर्बन ) योजनेतंर्गत सुधारीत पाणी पुरवठा योजनेसाठी १ .४९ कोटी निधी मंजुर, २५ / १५ योजना व दलित वस्ती सुधार योजनेसाठी १ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर याबरोबरच प्रादेशिक पर्यटन, साकव पुल, दलित वस्ती पाणी योजना, कुरणी वसाहत, सांस्कृतिक हॉल, बुद्धविहार,रमाई पंतप्रधान आवास, शाहु घरकुले , अपंगांच्या सुविधा यातील कामे लवकरच मार्गस्थ होत आहेत. कोरोणा महामारी व महापुराच्या संकटातील त्यांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता . भविष्यात सामाजिक चळवळ म्हणून उपेक्षितांच्यासाठी प्रबोधन चळवळ चालवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे .
देवानंद पाटील यांच्या या धडाडीच्या नेतृत्वामुळे नजीकच्या काळात त्यांचे उज्वल भविष्य दिसत आहे . त्यांच्या नेतृत्व गुणाला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांचा परिसस्पर्श झाल्यास देवानंद पाटील त्याचे सोने केल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित !