निढोरीत २४ आक्टोंबर रोजी महिलांसाठी विविध स्पर्धा तुझ्यात जीव रंगला फेम अक्षया देवधर ( अंजली बाई ) विशेष पाहुण्या

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
निढोरीचे माजी लोकनियुक्त सरपंच देवानंद नामदेव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खास महिलांसाठी रविवार दि- २४ आक्टोंबर रोजी दुपारी ३ वाजता विविध स्पर्धांचे आयोजन केले असुन महिलांच्या स्पर्धसाठी तुझ्यात जीव रंगला फेम अक्षया देवधर ( अंजली बाई ) या विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहीती महिला सबलीकरण समिती व वाढदिवस गौरव समिती निढोरी ता- कागल यांनी दिली आहे .
निढोरी येथे २४ आक्टोंबर रोजी दुपारी ३ वाजता होणाऱ्या या स्पर्धामध्ये डोक्यावर घागर घेवुन पळणे, रस्सीखेच, संगीत खुर्ची या स्पर्धांना प्रथम, द्वितीय , तृतीय व उत्तेजनार्थ ८१ हजारांच्या रोख बक्षीसासह सन्मान चिन्ह देण्यात येणार आहेत . तसेच सिने अभिनेता मदन पलंगे निवेदित होम मिनीस्टर स्पर्धांसाठी प्रथम क्रमांकास मानाच्या पैठणी सह वॉशिंग मशीन, द्वितीय क्रमांकास रेफ्रीजिरेटर, तृतीय क्रमांकला आटा चक्की दिली जाणार आहे .स्पर्धचे उद्याटन माऊली संस्था कागलच्या अध्यक्षा अमरिन मुश्रीफ, कागल नगराध्यक्षा सौ .माणिक माळी यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी सौ सुहासिनीदेवी पाटील असणार आहेत . तर बक्षीस वितरणास बिद्री साखर संचालिका सौ अर्चना विकास पाटील, माजी सरपंच सौ . शामल पाटील सह मान्यवर महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत