ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाहू साखरला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार मिळाल्याबद्दल शिंदेवाडीत साखर पेढे वाटून आनंदोत्सव

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

शिंदेवाडी ता.कागल येथे कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ,नवी दिल्ली या संस्थेने २०२०-२१ चा ‘ उच्च साखर उतारा विभागातील देशातील ‘सर्वोत्कृष्ट साखर कारखाना ‘ हा मानाचा पुरस्कार जाहीर केल्याबद्दल साखर पेढे वाटून तसेच फटाक्यांची आतषबाजी करत
आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी शिंदेवाडी गावचे माजी सरपंच, बिद्री साखरचे संचालक दत्तामामा खराडे, रमेश ढेरे , अशोक खराडे ,रमेश माळी, यांच्यासह शाहू कारखान्याचे कर्मचारी,सभासद तसेच शाहू ग्रुपचे सदस्य ,ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks