ताज्या बातम्यामहाराष्ट्र
सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ!

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने आतापर्यंतच्या किमतीतील सर्वोच्च उच्चांक गाठला आहे. त्यातच आता ऑक्टोबरच्या सुरूवातीपासूनच इंधनाचे दर चढतच असल्याचं पाहायला मिळत असल्याने सणासुदीच्या तोंडावर मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत असल्याचं भयावह चित्र निर्माण झालं आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल,डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत.
आता पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 35 पैशाने वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार सध्या मुंबईत पेट्रोलचा दर 112.78 रुपये प्रतिलीटर आहे. तर डिझेलचा 103.63 रुपये प्रतिलीटर आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 106.98 रुपये प्रतिलीटर आहे. तर डिझेलचा दर 95.62 रुपये प्रतिलीटर आहे.