ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकरी अडचणीत असताना एकरकमी एफआरपी देणे हा “शाहू पॅटर्न ” : समरजितसिंह घाटगे यांचे प्रतिपादन ४२ व्या गळीत हंगामाचा विधिवत शुभारंभ

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

शाहू साखर कारखान्यामध्ये कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी लोकप्रिय निर्णयापेक्षा लोकहिताच्या निर्णयांना नेहमीच प्राधान्य दिले. त्यासाठी व्यक्तिगत नुकसान सोसले.पण कारखाना व शेतकरी हितासाठी तडजोड केली नाही. त्यांचे हे धोरण राज्यभर *”शाहू पॅटर्न”* म्हणून नावाजले गेले. या वर्षी शेतकरी अडचणीत असताना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय हा याच पॅटर्नचा एक भाग आहे. असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

शाहू साखर कारखान्याच्या 42 व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या शुभ हस्ते या हंगामाचा शुभारंभ विधिवत संप्पन्न झाला.

ते पुढे म्हणाले, आज सर्वत्र शाहू पॅटर्न यशस्वी म्हणून नावाजला जातो. मात्र त्यासाठी स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी अत्यंत कष्ट घेतले आहेत. प्रसंगी कटू निर्णय घेतले त्यांना आपण सर्व सभासद शेतकरी बांधवांनी साथ दिली. त्यामुळे हा पॅटर्न नावारूपास आला आहे. शाहू पॅटर्नमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेऊ शकलो. हा निर्णय कुणाला त्रास देण्यासाठी किंवा अडचणीत आणण्यासाठी नाही तर अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला दिल्यास दिलासा देण्यासाठी घेतला आहे. असे स्पष्टीकरण त्यांनी केले.त्याला उपस्थित सभासद शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. यावेळी जेष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, सर्व संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद शेतकरी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी गव्हाण पूजा ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ आशाराणी पाटील, केनयार्ड विभागामध्ये संचालक मारुती निगवे व त्यांच्या सुविद्य पत्नी भारती निगवे व काटा पूजन संचालक पी.डी.चौगुले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.हौसाबाई चौगुले यांनी केली.
स्वागत व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे यांनी केले. संचालक सचिन मगदूम यांनी आभार मानले.

केलेल्या कामाचे मार्केटिंग
यावेळी श्री.घाटगे म्हणाले राजे नेहमी म्हणत असत की आपण फक्त काम करत रहायचे. त्याबाबत बोलत बसण्यापेक्षा कामाला प्राधान्य द्यायचे. तेव्हा त्यांनी केलेला नियमम अगदी बरोबर होता. त्यामध्ये मी आणखी छोटासा नियम वाढवला आहे.’ केलेल्या कामाचे योग्य पद्धतीने मार्केटिंग होणे आजच्या जमान्यात आवश्यक आहे व शाहू ग्रुपच्या आदर्श कामाचे मी मार्केटिंग करतोय इतकेच .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks