ताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय साखर महासंघाकडून भारतातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार जाहीर

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

देशातील सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ को अॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज नवी दिल्ली या संस्थेने येथील.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास
उच्च साखर उतारा विभागातील देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

गळीत हंगाम 2020-21 साठी हा पुरस्कार मिळाला असून शाहू साखर कारखान्यास आजअखेर मिळालेला हा ६४
वा पुरस्कार आहे.

यापूर्वी शाहू साखर कारखान्यास भारतातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार हंगाम 2002 -03, हंगाम 2007-08 व हंगाम 2013 -14 असा तीन वेळा मिळाला आहे.तर आता हंगाम 2020-21 साठी चौथ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे.
राष्ट्रीय पातळीवरील हा २३ वा पुरस्कार आहे. तर राज्य पातळीवरील 41 पुरस्कार मिळाले आहेत. कारखान्यास राज्य व राष्ट्रीय पातळीवरील आज अखेर मिळालेल्या पुरस्कारांची एकूण संख्या ६४ झाली आहे.त्याची सविस्तर माहिती अशी आहे. सर्वोत्कृष्ट साखर कारखाना-४ उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना- ११ तांत्रिक कार्यक्षमता-२२उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन -९ उत्कृष्ट ऊस विकास व्यवस्थापन -९ उत्कृष्ट डिस्टीलरी व्यवस्थापन-१ जास्तीत जास्त साखर निर्यात -२, प्रशंसा प्रशस्तीपत्र – १ इतर पुरस्कार -५ एकूण ६४ .
कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या कारकिर्दीत कारखान्यास राज्य व राष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या पुरस्कारांची संख्या ५५ आहे. त्यांच्या पश्चात विद्यमान चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांच्या कारकिर्दीतील हा नववा पुरस्कार आहे.
या पुरस्कार निवडीबाबतचे पत्र राष्ट्रीय साखर महासंघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी कारखान्यास पाठविले आहे.
हा पुरस्कार मंगळवार,दि. 16 नोव्हेंबर, 2021 रोजी दुपारी 2.00 वाजता NCUI सभागृह, 3 ऑगस्ट क्रांती मार्ग, , नवी दिल्ली येथे समारंभपुर्वक कारखान्यास प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार मिळाल्याचे पत्र प्राप्त होताच कारखाना कार्यस्थळावर फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला. शाहू ग्रुप विविध संस्था तसेच सभासद शेतकऱ्यांच्या वतीने समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार केला. कारखाना प्रांगणातील आराध्य दैवत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.

या पुरस्कारामुळे शाहू साखर कारखान्याचे सभासद शेतकरी अधिकारी कर्मचारी हितचिंतक पुरवठादार यांच्या समाधानाचे वातावरण पसरले आहे.

हा तर शाहूच्या सभासद कर्मचारी व शेतकऱ्यांचाच सन्मान: समरजितसिंह घाटगे
कारखान्याला मिळालेल्या या पुरस्करानंतर प्रतिक्रिया देताना शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, कारखान्याला हा मिळालेला पुरस्कार म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी हिताच्या कृतीचा वारसा, कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे व त्याला शाहू साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी विश्‍वास आणि प्रामाणिकपणाने दिलेली साथ, व्यवस्थापनाचे नियोजनास अधिकारी-कर्मचारी पुरवठादार यांच्या कष्टाची जोड याचाच हा गौरव आहे. राष्ट्रीय पातळीवर झालेला हा गौरव कुणा एका व्यक्तीचा नसून संपूर्ण शाहू परिवारातील परिवारातील प्रत्येक घटकाचा गौरव आहे.

यावेळी व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks