मुरगुड : पत्रकार संघाच्या पुढाकाराने मुदाळ तिट्टा ते निपाणी रस्त्यावर ‘रास्ता रोको’ आंदोलन

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
पत्रकार संघाच्या पुढाकाराने मुदाळ तिट्टा ते निपाणी रस्त्यावर ‘रास्ता रोको’ आंदोलन झाले .त्यास नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी पाठींबा जाहीर केला.
यावेळी पत्रकार संघाचे सर्व सदस्य , सर्व गावचे सरपंच ,संबंधित विभागाचे पंचायत समिती सदस्य ,मुरगुडमधील स्थानिक नागरिक व नगरपरिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आजच्या या रास्ता रोको आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. आंदोलन स्थळी तहसीलदार आणि अन्य अधिकाऱ्यांनी भेट घेत सोमवार पर्यंत जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक होऊन रस्ता करण्यास सुरुवात करण्याबाबत निर्णय होण्याबाबत अभिवचन दिले.
सोमवार पर्यंत बैठक झाली नाही तर या रस्त्यावर प्रत्येक गावात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.चार तासानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
मुरगुड पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.बडवे पोलिस फौजफाट्यासह बंदोबस्ताकरिता उपस्थित होते.