सुरुपली जवळ टेम्पोची दुचाकीला धडक; दोघे गंभीर जखमी

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड – निपाणी मार्गावरील सुरुपलीजवळ भरधाव टेंपोने मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले असून बेदरकारपणे टेम्पो चालवणाऱ्या टेम्पोचालकला पोलिसांनी अटक केली आहे. ऋतूराज अर्जुन पाटील (वय २१), सौरभ सुरेश पाटील असे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
या टेम्पोचालकाने मुरगूड तसेच यमगे येथील दोन वाहनांना ठोकरुन भरधाव चालला होता. सुरुपलीजवळ ठोकरलेल्या मोटरसायकलवरील दोघेजण सुदैवाने बचावले. मात्र मोटरसायकल व टेम्पोंचे मोठे नुकसान झाले आहे. अधिक माहीती अशी की,मुरगूडकडून टेम्पोचालक अनिल महादेव शेटके (वय ३७ रा. हदनाळ ता. चिकोडी) हा टेम्पो (क्रं. केए २३- २१४५) घेवून म्हाकवेकडे भरधाव चालला होता. त्याच्या पुढे मोटरसायकल (एम. एच. ०९ डीक्यू. ८९८१) वरुन ऋतूराज पाटील व सुरेश पाटील मुरगूडहून कुरुकलीकडे चालले होते. सुरुपलीजवळी शिवच्या पुलाच्या पुढच्या बाजूला आल्यावर भरधाव व बेदरकारपणे टेम्पोचालकाने त्या मोटरसायकला पाठीमागून जोराची धडक दिली व त्या मोटरसायकला सुमारे २५ फूट फरपटत नेवून टेम्पो शेजारी १५ फूट शेतीत पलटी झाला. यामध्ये ऋतूराज पाटील व सुरेश पाटील हे टेम्पोखाली अडकले होते. त्यांना बाहेर काढून दवाखान्यात दाखल केले.