ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागल : शेतकरी संघटनेमार्फत समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

गळीत हंगाम 2021- 22 साठी देशात सर्वप्रथम एफ.आर.पी एकरकमी देण्याची घोषणा शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांनी केली.उसकरी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या त्यांच्या या महत्त्व पूर्ण निर्णयाबद्दल बद्दल आज
शाहू साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर शेतकरी संघटनेच्या वतीने श्री घाटगे यांचा सत्कार करणेत आला.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर यांच्यासह तालुकाध्यक्ष बाळासो पाटील, स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष तानाजी मगदूम,अविनाश मगदूम प्रभु भोजे, पांडुरंग चौगुले,नितेश कोगनुळे, अनिल पाटील,बाबुराव सुतार दीपक हेगडे यांचा समावेश होता.यावेळी शाहू साखर कारखाना प्रधान कार्यालय परिसरात शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे फटाक्‍यांची आतषबाजी करून व साखर पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
यावेळी करवीर तालुका पूर्वभाग पत्रकार संघाच्या वतीने ही श्री घाटगे यांचा सत्कार केला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपीसाठी जागर सुरू केला आहे. याच दरम्यान श्री. घाटगे यांनी ती एकरकमी देण्याची घोषणा करून या लढ्याला बळ दिले आहे.त्यामुळे आता बाकीचे कारखानदार सुद्धा घोषणा करीत आहेत. शाहू साखर कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जपले आहे.

गळीत हंगाम 2021-22 सुरू होण्याच्या तोंडावर एफआरपीची रक्कम दोन टप्प्यात कि तीन टप्प्यात द्यावयाची याबाबत चर्चा सुरू होती. एफआरपी ची रक्कम एकरकमी मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जागर एफआरपीचा मोहीम सुरू केली होती.या दरम्यान श्री घाटगे यांनी शाहू साखर कारखान्याची एफआरपी एकरकमी देण्यात येणार असल्याची घोषणा सर्वप्रथम केली, व दिल्लीला गेले.आज ते कारखाना कार्यस्थळावर दाखल होताच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी कारखान्याच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवन या प्रधान कार्यालयात हजेरी लावली

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks