गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर तलवार हल्ला : अंबाई टँक परिसरात तिघांचे कृत्य, तरुण गंभीर जखमी

कोल्हापूर प्रतिनिधी :
पैसे देण्यास नकार दिल्याने तीन तरुणांनी केलेल्या तलवार हल्ल्यात रविवार पेठ येथील अक्षय रविंद्र यादव ( वय २५ ) हा गंभीर जखमी झाला आहे. डोक्यावर पाठीवर व पोटावर उर्मी हल्ला झाल्याने तरुणाची प्रकृती गंभीर बनली आहे. त्यास तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनंतर संशयितांनी तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी आणि ८ हजार रुपयांची रोकड घेऊन पसार झाले.अंबाई टँक येथील मध्यवर्ती चौकात शनिवारी दुपारी हा प्रकार घडल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले. दरम्यान काही काळ वातावरण तणावाचे बनले होते. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.