शब्द जपून वापरतोय नाहीतर फाडायला वेळ लागणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विरोधकांना ठाकरे शैलीत उत्तर

NIKAL WEB TEAM :
आज राज्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात दसरा साजरा होत आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून मुंबईत दसरा मेळावा साजरा करण्याची परंपरा आहे. बाळासाहेब ठाकरे आपल्या विरोधकांचा समाचार आपल्या शैलीत या मेळाव्यात घ्यायचे. आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या शैलीत विरोधकांचा समाचार घेत आहेत.
शिवसेना ही आपल्या शैलीसाठी प्रसिद्ध आहे. दसरा मेळाव्यापासूनच देशात ठाकरे शैली प्रसिद्ध आहे. आजही उद्धव ठाकरे यांनी याच ठाकरे शैलीत विरोधकांचा समाचार घेतला आहे. माझ्याकडं वडीलोपार्जीत शब्दांची संपत्ती आहे ती वापरतोय, उगाच मला काही बोलयला भाग पाडू नका. शब्द जपून वापरतोय नाहीतर फाडायला वेळ लागणार नाही, या शब्दात ठाकरे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सर्व मुद्द्यांना आपल्या भाषणात हात घातला आहे. भाजपतर्फे करण्यात येणाऱ्या आरोपांना उद्धव ठाकरे यांनी आज ठाकरे शैलीत उत्तर दिलं आहे.