ताज्या बातम्यामहाराष्ट्र

करवीर : सावरवाडी येथे उसाच्या शेतीस आग लागून जवळपास अडीच लाखाचे नुकसान.

सावरवाडी प्रतिनिधी :

दसरा सणातील खंडे नवमीच्या पालखी सोहळ्यात सारे गाव सामील झाल्याचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने करवीर तालुक्यातील सावरवाडी येथे आज गुरुवारी खणीचा माळ या ठिकाणच्या उसाच्या फडास आग लागून जवळपास अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. 

    प्राप्त  माहितीनुसार सावरवाडी येथील गट क्रमांक ६३७ मधील नामदेव केशव दिवसे, गट क्र.६१५ शंकर महादेव दिवसे  यांचे मालकीची एक एकर ऊस क्षेत्र जमिन आहे. आज सकाळी १०. वाजता सारे गाव खंडेनवमी निमित्य देवालयात असलेले पाहुन अज्ञाताने ऊसास आग लावली, अशी माहिती घटनास्थळावरून शेतकऱ्यांनी सांगितली  आहे.

                    ऊसास आग लागली हे धूर व जळलेल्या धुवा, आवाज या आधारे लक्षात येताच ग्रामस्थ व शेतकरी यांनी मिळून आग आटोक्यात आणली.वेळेत लक्षात आल्यामुळें मोठा अनर्थ टळला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks