विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबर सुसंस्कार घडावेत -पोलीस निरीक्षक विकास बडवे सोनगेत शालेय साहित्य वितरण समारंभ संपन्न

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकास अणि गुणवत्तेबरोबर सुसंस्कार महत्त्वाचे असून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन मुरगूड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विकास बडवे यांनी केले ,सोनगे ता.कागल येथील विद्या मंदिर सोनगे येथे कै.श्री. हिंदुराव अनंत लोहार यांच्या स्मरणार्थ येथिल सामजिक कार्यकर्ते श्री.रोहित लोहार यांनी आयोजित केलेल्या शालेय साहित्य वितरण समारंभाच्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते
. शाळेतील 30 विद्यार्थ्यांना दप्तर,पाटी,कंपास,पेन,ड्रॉइंगवही ,स्केचपेन,लहान मोठ्या वह्या पेन्सिल बॉक्स,खडू पेटी,रबर,फुट पट्टी,इत्यादी साहित्य वितरण प्रमुख पाहुण्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते वितरण करनेत आले
यावेळी बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा. श्री. प्रवीणसिंह भोसले व सरपंच सुनिल घोरपडे उपस्थित होते.प्रविणसिंह भोसले म्हणाले की रोहित लोहार यांनी गेल्या चार वर्षापासून केलेले एक शैक्षणिक कार्य कौतुकास्पद आहे. अशी लोक समाजात तयार होणे गरजेचे असुन शैक्षणिक विकासातून विद्यार्थी देशपातळीवर चमकायला वेळ लागणार नाही . .
यावेळी श्री कृष्णात लोंढे श्री.जयसिंग पाटील श्री.साताप्पा कांबळे यांची मनोगते झाली,कार्यक्रमासाठी श्रीपती देवडकर, श्री. पी. वाय. डावरे, श्री. ईश्वरा देवडकर, श्री.विलास कळंत्रे, श्री. बाळासो पाटील,श्री.अरुण शिंत्रे,श्री.दिनकर ढोले, श्री. बाळासाहेब घोरपडे, श्री. धनाजी पाटील, श्री. अमर पाटील, श्री. उदय वायचळ, श्री. दीपक मुळे श्री. कृष्णात लोंढे, श्री. आनंदा लोहार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक शालेय शिक्षक वृंद, शालेय व्यवस्थापन समिती, व तरुण मंडळाचे कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते .क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत व प्रास्ताविक श्री. पांडुरंग रावण सर यांनी तर आभार सतिश लोंढे यांनी मानले