ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूडच्या साई कुस्ती केंद्रासाठी १४ व १५ आक्टोंबर ला निवड चाचणी कुस्ती स्पर्धा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगुड येथील स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलासाठी ८ ते १४ वयोगटातील पैलवानांची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा दि .१४ व १५ आक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथील साई कुस्ती केंद्रात होत असल्याची माहीती जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी खास . संजयदादा मंडलिक दिली आहे .
ज्या विद्यार्थी पैलवानांनी जिल्हा, राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलाअसेल .त्यांची सरळ निवड केली जाणार आहे. ही निवड चाचणी स्पर्धा घेण्यासाठी भारतीय खेल प्राधिकरण (साई) स्पोर्टस ट्रेनिंग सेंटर कांदिवली पूर्वचे सहाय्यक संचालक व साई कुस्ती कोच अमोल यादव व सी.बी. चव्हाण उपस्थित राहणार आहेत .
३२ किलो वरील विद्यार्थी पैलवानाना या निवड चाचणी मध्ये सहभाग घेता येईल.निवड चाचणी स्पर्धेकरिता विद्यार्थी पैलवानांनी आधारकार्ड,शाळेची बोनाफाईड सर्टिफिकेट ,जन्म नोंद दाखला , रेशन कार्डची झेरॉक्स व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत नैपुण्य मिळवलेले प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे प्रमाणपत्र घेऊन हजर राहावे. निवड झालेल्या विद्यार्थी पैलवानांना दर महिना रुपये १००० रू . मानधन व स्पोर्ट्स किट मिळणार आहे. तरी या संधीचा फायदा कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी पैलवान यांनी घ्यावा.असे आवाहन खासदार संजयदादा मंडलिक व वस्ताद सुखदेव येरुडकर कोच दादासो लवटे यांनी केले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks