ताज्या बातम्यामहाराष्ट्र

करवीर तालुक्यात भात पिकाच्या कापण्यांना प्रारंभ

सावरवाडी प्रतिनिधी :

जून महिन्यात पेरणी केलेल्या खरीप हंगामातील भातपिकांच्या काढणी मळणीच्या कामांना करवीर तालुक्यात प्रारंभ झाला आहे . पावसाने थोडीफार उघडीप दिल्याने भात पिकांच्या सुगीला गती येऊ लागल्याचे दृश्य ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे

यंदाच्या खरीप हंगामास अतिवृष्टी , महापुराचा चांगलाच फटका बसला . भोगावती , तुळशी, कुंभी नद्यांच्या काठावरील पुराच्या पाण्यामुळे भात शेती वाया गेली , ग्रामीण भागातील माळरान , डोंगरी माथ्यावरील खरीप पिके जोमात आली आहेत . शारदीय नवरात्र उत्सवात बळीराजा नव्या खरीप पिकांच्या काढणी, मळणीच्या कामांना प्रारंभ करतो .

 शिवारात कॉटच्या साह्याने भात पिकाच्या झोडणीची कामे गतीमान होऊ लागली आहे . 

              करवीर तालुक्यात भात पिकांच्या कापण्या मळणीच्या कामांना प्रारंभ झाल्याने शिवारं मान सांच्या गर्दी फूलून गेली आहेत . करवीर तालुक्यातील भाटणवाडी येथील प्रगतशील शेतकरी परसू भोपळे यांच्या शिवारात भात कापणी मळणीच्या कामांची उडालेली झुंबड .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks