ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाजारभोगांव ता. पन्हाळा येथील स्व. नितीन पाटील प्रतिष्ठान, बाजारभोगांव यांच्या मार्फेत स्व. नितीन पाटील (सरपंच) यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत; स्व. नितीन पाटील (सरपंच) यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी जनसुराज्य शक्ती पक्ष भक्कमपणे उभा राहणार : आमदार डॉ. विनय कोरे (सावकर)

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

नितीन पाटील हाडाचा कार्यकर्ता होता. लोकांच्या सुख दुःखात काम करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य झोकून दिलं होतं. पश्चिम भागातील गोरगरीब जनतेचा खरा आधार होता. त्यांनी आपल्या कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण केली होती. कोरोना काळात समाजाचे मरण स्वतःवर घेणारा कार्यकर्ता लोकांच्या हृदयातील खरा लोकनेता होता. समाजासाठी व संघटनेसाठी धडपडणारे स्व.नितीन पाटील यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही ठाम पणे सैदेव सोबत राहू असे आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी बोलताना सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य विशांत महापुरे, शिवाजी मोरे, शंकर पाटील, पन्हाळा पंचायत समिती सभापती वैशाली पाटील, उपसभापती रश्मी कांबळे, सदस्य अनिल कंदुरकर, रणजित शिंदे, पन्हाळा तालुका संपर्क प्रमुख रविंद्र जाधव (सरपंच), जयसिंगराव हिर्डेकर, बाबासाहेब खोत (बाजार भोगाव – सरपंच), प्राथमिक शिक्षक बँकेचे नेते राजाराम वरुटे, बजरंग लगारे (गुरुजी), माजी जि प सदस्य सुभाष सावंत, वाळोलीच्यां सरपंच शोभाताई पाटील, ए बी पाटील, युवराज पाटील, माजी उपसभापती पी आर पाटील (पोहाळे), युवराज बेलेकर, उमेश भोगावकर, अर्जुन पाटील (किसरूळ), आसपासच्या गावातील सरंपच, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक ॲड.प्रकाश देसाई यांनी केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks