ताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘जलसाक्षरता संवाद’ विषयी ऑनलाईन बैठकीचे आयोजन : उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमार्फत मंगळवार दि. 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.30 ते 5 या वेळेत ‘जलसाक्षरता संवाद’ या विषयावर ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक जिल्हास्तरीय जलसाक्षरता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली आहे.

ऑनलाईन जलसाक्षरता संवाद बैठकीस सर्व जलनायक, जलयोध्दा, जलप्रेमी, जलदूत, जलसेवक व जलकर्मी उपस्थित राहणार आहेत. या ऑनलाईन बैठकीत सहभागी होण्यासाठी खालील Microsoft Teams ची (https://teams.microsoft.com/l/meetup) लिंक वापरावी.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks