ताज्या बातम्यामहाराष्ट्र
शिवशक्ती तरुण मंडळ दासेवाडी मंडळाच्या नवीन साऊंड सिस्टिम व झांज पथक साहित्याचे अनावरण.

गारगोटी प्रतिनिधी :
शिवशक्ती तरुण मंडळ दासेवाडी मंडळाने आयोजित केलेल्या नवदुर्गा उत्सव आरती कार्यक्रमानिमित्त मंडळातर्फे नवीन साऊंड सिस्टिम व झांज पथक अनावरण कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमासाठी खास उपस्थित भुदरगड पंचायत समितीचे माजी सभापती बाबा नांदेकर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रकाश पाटील, युवा नेते संदीप वरंडेकर, माजी सभापती सौ सरिता वरंडेकर, आप्पा वरंडेकर, सरपंच मारुती पाटील , डे. सरपंच मनोहर मांगले, बाजीराव पाटील, ग्रा.पं. सदस्या सौ. सरिता मोहिते, सौ. प्रज्ञा भालेकर, सौ. वंदना वरंडेकर, कृष्णा दासव, विश्वास दासव, महादेव मांगले, जयसिंग मांगले, सुहास दळवी, दशरथ बेळणेकर, अर्जुन पाटील, आशिष रेपे उपस्थित होते.