गावांसोबत ज्ञान मंदिरांचाही विकास महत्वाचा : जि.प. सदस्य मनोज फराकटे

बिद्री प्रतिनिधी :
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गावांच्या विकासासोबतच प्राथमिक शाळांचा विकास करण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यांच्या आदर्शानुसार आपणही या ज्ञानमंदिरांच्या विकासासाठी कटिबद्ध असून मतदारसंघातील गावांच्या प्राथमिक शाळांसाठी जास्तीत जास्त निधी देण्याचा आपला प्रयत्न राहील, असे मत जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे यांनी व्यक्त केले.
बोरवडे ( ता. कागल ) येथील प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांची दुरुस्ती व सुशोभीकरण यासाठी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे यांच्या फंडातून मंजूर झालेल्या पाच लाख रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.या निधीतून वर्गखोल्यांच्या छतांची दुरुस्ती, अंतर्गत रंगरंगोटी, प्रवेशद्वारापासून आत चिरा बांधकाम करुन कठडा बांधणे आदी कामे केली जाणार आहेत.
यावेळी माजी पं.स. सदस्य रघुनाथ कुंभार, उपसरपंच मंगल साठे, शा. व्य. अध्यक्षा अमृता चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. विनायक जगदाळे, ग्रा.पं. सदस्य डॉ. रमेश चौगले, राजेंद्र जाधव, बबन धोंड, अशोक कांबळे, मारुती साठे, विनोद वारके, चंद्रकांत चव्हाण, भागवत पोवार, मुख्याध्यापक विलास पोवार यांच्यासह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार युवराज सातुसे यांनी मानले.